Guhagar

Guhagar Guhagar is a census city in Ratnagiri district in the Indian state of Maharashtra.

Guhagar is known for its virgin beach, coir items, coconuts, betel nuts and mainly Haapus Alphonso mangoes मुंबईहून किंवा पुण्याहून कुंभाली घाटाने चिपळूण गाठायचं. चिपळूणहून तासाभरात येतं गुहागर. या प्रवासाला फक्त सहा ते सात तास लागतात. गुहागर पाहायला सुरुवात करायची ती गोपाळगडापासून, अंजनवेल गावातून पायरस्त्याने किंवा थेट गाडीरस्त्याने गोपाळगडावर जाता येतं. या गडावरून वशिष्ठी नदीच्या मुखावर वसलेलं

दाभोळ बंदर आणि तिथून चिपळूणपर्यंत ये-जा करणारी मालवाहू जहाज यावर प्राचीन काळी व ऐतिहासिक कालखंडातही नजर ठेवली जात असे. भक्कम बारा बुरुज, विहिरी व पडक्या इमारतीचे अवशेष किल्ल्यात आजही पाहायला मिळतात. किल्ल्यावरून समुद्र व खाडीचं होणारं दर्शन विलोभनीय आहे.
गोपाळगड पाहून परत गुहागरला येताना वरच्या पाटामध्ये दुर्गादेवीचं मंदिर आहे. देवीची मूर्ती संगमरवराची आणि अष्टभुजा असून ती महिषासुराचं मर्दन करीत आहे. मंदिरासमोर पुष्करणी म्हणजे छोटा तलाव आहे. मंदिराचं प्रवेशद्वार भव्य व आकर्षक आहे. वरच्या पाटातून देवपाटात आल्यावर उफराटा गणपती मंदिर आहे. त्याबद्दलची आख्यायिका अशी..
समुद्राचं पाणी वाढून त्यात गुहागर बुडून जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी श्री गणेशाने आपलं तोंड समुद्राकडे, म्हणजे पश्चिमेकडे वळवलं आणि समुद्र शांत झाला. मात्र नाव उफराटा असं असलं, तरी गणेशमूर्ती सुबक संगमरवरी आहे.
श्री व्याडेश्वर हे गुहागरचं आद्य दैवत. हे शिवपंचायतन आहे. मंदिर परिसरात गणपती, विष्णू, सूर्य व श्रीदेवी यांची मंदिरं आहेत. मंदिराचा रंग राखाडी आहे.
गुहागरच्या पुढे पालशेत हे अतिप्राचीन गाव आहे. पालशेतहून निवोशीकडे जाणा-या रस्त्याने घाट चढून गेल्यावर सुसरोंडीची गुहा पाहता येते. 2001 साली झालेल्या उत्खननात येथे दगडी अवजारं सापडली. त्यावरून ही गुहा 90 हजार वर्ष इतकी जुनी असल्याचा निष्कर्ष पुरातत्त्ववेत्त्यांनी काढला आहे. सुंदरी नदीच्या धबधब्याच्या बाजूने उतरून नदी ओलांडून गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ जाता येतं.
पालशेतमध्ये १६व्या शतकापर्यंत अस्तित्वात असणा-या बंदरांचे अवशेषही सापडले आहेत. जांभ्याच्या दगडामध्ये बांधलेल्या बुरुजांचा तर व पायऱ्या याची साक्ष देतात. याशिवाय पालशेतमध्ये पुरातन सागरी मार्गाच्या खुणा आहेत. इ.स. पूर्व दुस-या शतकात सम्राट अशोकाच्या काळी किनाऱ्यावरच्या कोकणातल्या बंदरांना जोडणारा महामार्ग अस्तित्वात होता, असं पुरातत्त्ववेत्त्यांचं मत आहे.
पालशेतहून पुढे जाताना वेळणेश्वर लागतं. वेळणेश्वरच्या टेकडीवरून रस्ता उतरताना समुद्राचं सुंदर दर्शन होतं. समुद्रकिनाऱ्यावरला वा वेळागरवरला देव म्हणजे वेळणेश्वर. मंदिर परिसरात कालभैरव, विष्णू आणि गणपती मंदिर आहे. वेळणेश्वर मंदिराचं स्थापत्य अनोखं आणि विशेष आहे. माघ महिन्याच्या महाशिवरात्रीस इथे मोठा उत्सव असतो.
वेळणेश्वरहून सहा किमीवर हेदवी आहे. येथील दहा हातांचा श्री दशभूजा गणपती प्रसिद्ध आहे. टेकडीच्या कडेला असलेलं मंदिर आणि दीपमाळ आकर्षक रंगात रंगवलेली आहे. श्री गणेशाचं दर्शन व मंदिर परिसर अतिशय प्रसन्न आहे. हेदवीला आणखी एक रम्य ठिकाण पाहण्यासारखं आहे, ते म्हणजे बामणघळ. हेदवी किना-यावर उमा महेश्वर मंदिराशेजारी खडकात किना-यावर वरून येणा-या पाण्याने व सागरी लाटांनी ही घळ तयार केली आहे. समुद्राच्या लाटांचं पाणी यात घुसतं. भरतीच्या वेळी त्याचा फवारा उंच उडतो. ही गंमत पाहण्यासारखी आहे; पण दूरूनच!


हेदवीच्या दक्षिणेस तवसाळ गावचा नयनरम्य किनारा आहे. शास्त्री नदीच्या खाडीमुखावर जयगडचा जोडीदार विजयगडचा किल्ला तवसाळ गावात पाहावयास मिळतो. गुहागरच्या परिसरात येण्यासाठी दाभोळ-धोपावे, काताळे, सैतवडे अशी फेरीबोट सेवाही उपलब्ध आहे. गुहागरमधील असलेली, बुधल, नरवण, शीर, मरळ, कोंड, कारूंळ अशी अनेक पर्यटनस्थळं पाहायची असतील तर किमान पाच-सहा दिवसांचा मुक्काम करावयास हवा. येथील डेरवण व परशुरामाचं मंदिरही पाहण्यासारखं आहे

Address

Guhagar
Ratnagiri
415726

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Guhagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Guhagar:

Share