21/07/2026
⛰️ लिंगा डोंगर ट्रेक – एक न विसरता येणार ट्रेक...!
धुक्याच्या चादरी मध्ये लपलेला धारेश्वर धबधबा...
जिथे काही ठिकाणी सूर्य किरण ही जमिनीला स्पर्श करत नाहीत अशी दाट जंगलवाट...🏕️🚶
निसर्गाने नटलेले डोंगर, त्यांच्या कुशीतून जाणारी नागमोडी वाट, सोबत मुसळधार पाऊस, सुसाट वारा आणि घसरड्या पायवाटेवर दोरीच्या सहायाने खाली उतरताना निसरड्या वाटेने धडपडत केलेला प्रत्येक टप्पा... हेच तर खरं साहस...!🥰🤟
या प्रवासात मिळालेला निसर्गाचा सहवास, मित्रांसोबतची धमाल-मस्ती, एकमेकांना दिलेली साथ आणि शेवटी सगळ्यांनी मिळून वाटून खाल्लेला डब्यामधील खाऊ... हाच तर ट्रेकचा खरा आनंद..! ❤️😇
ट्रेक म्हणजे फक्त पहिलं जाऊन शिखर गाठणं नाही, तर वाटेतले प्रत्येक क्षण मनात कायमचे साठवणं आणि एकत्र सर्वांना सोबत घेऊन ट्रेक करणे....🥰⛰️