कोकण

कोकण We are a team of Adventure Enthusiasts which has a mix of Experienced Adventurers & the young Explorers. We have started this venture to cater your Adven

Prawasvede invites you to ⛰️*Devkund Waterfall Trek*_Easy for All One Day Trek_🗓  *2nd July 2023* (_Departure on 1st Nig...
28/06/2023

Prawasvede invites you to

⛰️*Devkund Waterfall Trek*
_Easy for All One Day Trek_

🗓 *2nd July 2023* (_Departure on 1st Night_)

🏁 Starting Point : Prawasvede Office,Sadashiv Peth, Pune

🛫 DEP : 10:30 p.m. | Saturday
🛬 ARV : 08:30 p.m.| Sunday

💰 _*Fees :*_

*₹1275/- (Pune - Pune with Transport)*

✅ *Inclusions :*

🚌 Travel in a Private Vehicle (non-AC)
🍴 Breakfast, Lunch, Evening Tea
🍊 Energy Perks for the Trek
🏵️ Travel with *MahaTourism Approved Adventure Tourism Operator*
🧗🏻‍♂️ Certified & Experienced Trek Leads
💊 First aid kit Available

🔖 _For More details & Registrations:_
📞 *Call us: 8551999299*
www.prawasvede.in

यंदा होळीला कोणकोण येतंय कोकणात?
07/03/2021

यंदा होळीला कोणकोण येतंय कोकणात?

मराठी इतिहासात महत्त्वाचं स्थान असलेला एक दुर्ग म्हणजे पन्हाळगड. सहस्त्रक भर इतिहास असलेल्या या दुर्गाचे येत्या काही भाग...
06/01/2021

मराठी इतिहासात महत्त्वाचं स्थान असलेला एक दुर्ग म्हणजे पन्हाळगड. सहस्त्रक भर इतिहास असलेल्या या दुर्गाचे येत्या काही भागात टप्प्याटप्प्याने आपण दर्शन घेणार आहोत.

या भागात आपण नरवीर शिवा काशिद यांच्या समाधीचं दर्शन घेऊयात, सोबतच त्याचा इतिहास जाणून घेऊयात.

आणि दुर्गावर प्रवेश करताना लक्षात न येणारी परंतु, महत्त्वाची जागा म्हणजे चार दरवाजा पाहणार आहोत.

नक्की पहा...

https://youtu.be/mNUnHMvWnog

DO WATCH | LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE

19/12/2020

विशाळगडावर जो अनुभव मिळाला, तो खरंच इतर कोणत्याही गडावर नाही आलेला. या बाबत जितकं वाचलं, पाहिलं होतं, त्यात "भाविकांनी गडाचा उकिरडा केला आहे." एवढं एकच वाक्य दिसत होतं. मग विचार केला की जितकं शक्य होईल तेवढा अनुभव शेअर करायलाच हवा... म्हणून हा प्रपंच..

विशाळगडावर जो अनुभव मिळाला, तो नक्की काय होता, हे नक्की बघा...

https://youtu.be/TFnq1WTa7oQ

सुप्रभात मंडळी,माझ्या वेल्हा, पासली, मढे घाट राईड च्या vlog ला जो प्रतिसाद दिलात, ते खरंच भारी आहे. आज मी पुन्हा एक नवीन...
20/10/2020

सुप्रभात मंडळी,

माझ्या वेल्हा, पासली, मढे घाट राईड च्या vlog ला जो प्रतिसाद दिलात, ते खरंच भारी आहे. आज मी पुन्हा एक नवीन vlog घेऊन आलोय.

यावेळी मी एक trek vlog बनवलाय.

कोकणातून देशावर येणाऱ्या वाटा सुरक्षित करण्यासाठी अनेक किल्ले बांधले गेले. कोरबारसं मावळात सुद्धा असेच काही किल्ले बांधले गेले. त्यापैकी अगदी ऐन घाटांवर लक्ष ठेवता येईल अश्या जागी उभा असलेला किल्ला आहे घनगड. छोटेखानी आणि सुंदर अश्या किल्ल्याबद्दल जाणून घेऊयात या vlog मधून...

घनगड हा किल्ला पुण्याच्या पश्चिमेला कोरबारस मावळात येतो. कोकणातून देशावर येणाऱ्या वाघजाई, भोरप्या, नाणदांड अश्य....

होळी जवळ आली की कोकणातल्या बऱ्याच गावांमध्ये तयारी सुरु होते. काही गावांच्या क्षेत्रात याच काळात जत्राही भरतात.. अशीच एक...
20/02/2020

होळी जवळ आली की कोकणातल्या बऱ्याच गावांमध्ये तयारी सुरु होते. काही गावांच्या क्षेत्रात याच काळात जत्राही भरतात.. अशीच एक जत्रा दापोली जवळ भरलेली असताना काढलेलं हे छायाचित्र.

डोंगरात भटकंती करताना काही गोष्टी नेहमीच लक्षात ठेवायच्या असतात. त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजूबाजूला काय काय आहे ...
19/12/2019

डोंगरात भटकंती करताना काही गोष्टी नेहमीच लक्षात ठेवायच्या असतात. त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजूबाजूला काय काय आहे हे नक्की जाणून घ्यावं पाहावं आणि लक्षात ठेवावं. यानं होतं असं की, एकतर म्हणजे ही पर्वणी असेल सह्याद्रीतल्या विविध जागा, किल्ले, सुळके वेगवेगळ्या बाजूंनी न्याहाळून त्यांचं सौन्दर्य मनात भरण्यासाठी आणि अगदीच कधी बाका प्रसंग आला तर या गोष्टी खाणाखुणा म्हणून लक्षात राहतील...

असंच एक दृश्य दिसतं साम्रद गावातून संधान दरीच्या दिशेने चालताना... या पठारावरून आपल्याला समोर एक सुळका दिसतो.. हा आहे रतनगडाचा खुट्टा आणि त्याच सोबत थोडा उजवीकडे वर खुद्द रतनगड दिसतो. त्याची उंची, कोकणच्या बाजूने दिसणाऱ्या कड्याची उंची पाहिली की मग आपण पाहिलेला रतनगड खरंच किती उंच आहे याचीही जाणीव होते आणि त्या गडाची निर्मिती तिनेच का झाली असावी याचंही थोड्याफार प्रमाणात उत्तर मिळतं...

महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. निरनिराळ्या कालखंडात निरनिराळ्या राजवटींमध्ये बांधले गेलेले.. अगदी हजार बाराशे वर्षांपूर्...
18/12/2019

महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. निरनिराळ्या कालखंडात निरनिराळ्या राजवटींमध्ये बांधले गेलेले.. अगदी हजार बाराशे वर्षांपूर्वीपासून अठराव्या शतकापर्यंत राज्य केलेल्या विविध राजवटींचा प्रभाव या सर्व किल्ल्यांवर पडलेला दिसतो. यातले खासकरून शिवकालीन किल्ले जास्त प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्यावर ये-जा सुद्धा बरीच चालू असते. परंतु, असे अनेक किल्ले आहेत ज्यांच्या भाग्यात शिवकालीन इतिहास फार कमी आलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे आपले लक्षही कमीच पडलेलं आहे.
आता हेच पहा ना... मनमाड जवळ किल्ल्यांची जणू एक माळच तयार झालेली आहे. त्यांची नावेसुद्धा बर्याच इतिहासप्रेमींनाही माहीत नाहीत. इथला अंगठावजा हडबीची शेंडी नावाचा सुळका, कात्रा किल्ला, शंभूचा डोंगर, मच्छिन्द्रनाथ डोंगर, अंकाई-टंकाई अशी रांगच आहे. यातल्या अंकाईशेजारुन तर रेल्वे सुद्धा जाते. परंतु, माहिती नसल्याने लोकांचं लक्ष फारच कमी. अंकाई किल्ला तर अगसीत ऋषींचं स्थान. परंतु, तरीही केवळ स्थानिक लोकांमध्ये माहिती असलेली ही जागा. याच्या जोडीचा टंकाई किल्ला म्हणजे एक मोठं पठार आहे. ज्यावर काही पाण्याची टाकी, तटबंदी आणि एक शिवमंदिर आहे. हे पडलेलं शिवमंदिर, समोरचं पाण्याचं विस्तीर्ण तळं सोडलं तर किल्ल्यावर सगळीकडे केवळ गुरांचा वावर दिसतो.
हे शिवमंदिर मात्र पाहण्यासारखं आहे. शिल्पयुक्त नक्षीकामाच्या दगडांनी बांधलेलं अजूनही थोडाफार तग धरुन असलेल्या मंदिरात शिवपिंड आणि समोर एक तुटक नंदी आहे.
बराच काळ हा संपूर्ण भाग मोगलाईत असल्याने तसंच, पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांपासून लांब असल्यामुळे कदाचित इथे लोकांचा राबता कमी असावा..

या किल्ल्याच्या पायथ्याला एक सुंदर लेण्यांचा समूह आहे.. त्यावर पुन्हा कधीतरी बोलूयात.

There are many Forts in Maharashtra. These forts are built by various rulers through the historic times of Maharashtra. out of all these forts, mostly forts from the Shivaji Maharaj Reign are famous and people do visit these place more often. Other forts however, lack in attraction as they are far from the main cities and have less connection with Maratha History.
For example, A range of pinnacles and Forts near Manmad even has Railway line passing next to it, abd is still not known in the History lovers community.
Ankai Fort in this range is also the place where Agasti Hrushi stayed for a long time.
Tankai is the Neighboring fort to Ankai. This plateau type fort today, has barely any structures to showcase. a Shiva Temple is a must visit place on the fort.

रायगड... जावळीच्या जंगलातून वर आलेला, चहूबाजूंनी खड्या कातळभिंती असलेला आणि सुदूर नजर जाईल असा एक सुंदर किल्ला. इथून दिस...
17/12/2019

रायगड... जावळीच्या जंगलातून वर आलेला, चहूबाजूंनी खड्या कातळभिंती असलेला आणि सुदूर नजर जाईल असा एक सुंदर किल्ला. इथून दिसणारा राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, कोकणदिवा, डझनभर घाटवाटा.. गडाकडे पाहताच पटावं की, हा गड नक्कीच राजधानीच्या लायकीचाच नव्हे तर राजधानी बनण्यासाठीच पृथ्वीच्या पोटातून वर आलाय.. गडावर काय काय आहे हे तर आपण कित्येकदा पाहिलंय.. सोबतच्या छायाचित्रातलं दृश्य सुद्धा आपण खूपदा पाहिलंय.. पण, इथूनच किल्ला पाहण्यापेक्षा चहूबाजूंनी असाच त्याच्या पायथ्याशी जाऊन पाहता आला तर? हे शक्य आहे... रायगडाची प्रदक्षिणा केली तर हा किल्ला किती भक्कम आणि कसा रुबाबदार आहे.. याच्या पायथ्याचं जावळीचं जंगल किती दाट आहे, किती समृद्ध आहे हे सर्व पाहता येतं.. अगदी एका दिवसात आपली रायगडाकडे पाहण्याची दृष्टीच बदलते..
आम्ही जातोय... तुम्ही येणार का सोबत?

Raigad Fort is one of the beautiful forts in Sahyadris. Thick Vegetation at the base, straight rock walls from all sides, Numerous forts like, Rajgad, Torna, Lingana, Pratapgad, Kokan Diva, a dozen of ghat routes connecting Kokan and Mainland of Maharashtra in the vicinity. After looking at all these aspects one can be convinced that this fort deserved to be the Capital of Swarajya by all means.
The photo attached here is also seen many times.. but, how about exploring all the sides of this forts from base? walking around the fort to see how huge it is from all sides, to explore the richness of the Jungles around it can be fun. Once we do this trail, our perspective to look at this fort changes like anything.
we are going... are you willing to join us?

छत्रपती शिवराय या नावाबद्दल आपण सर्वांनाच अभिमान आहे, असतो आणि असावाच.. त्याला कारणंसुद्धा तशीच आहेत. ज्या वयात आजकालची ...
16/12/2019

छत्रपती शिवराय या नावाबद्दल आपण सर्वांनाच अभिमान आहे, असतो आणि असावाच.. त्याला कारणंसुद्धा तशीच आहेत. ज्या वयात आजकालची मुलं आज कपडे कोणते घालायचे हे ठरवू शकत नाहीत, त्या वयात 'शिवाजी शहाजी भोसले' नावाचा एक नवयुवक स्वराज्याची स्वप्ने पाहतच नव्हता तर आपल्या सोबत्यांना घेऊन ती स्वप्नं साकारत होता. आणि याच नवयुवकाला आज आपण मानाने, आदराने शिवछत्रपती म्हणून ओळखतो. त्यांची दूरदृष्टी किती मोठी होती, त्यांच्या प्रत्येक भूमिकेमागे किती विचार असायचा याचा प्रत्यय त्यांच्या आयुष्यात डोकावून पाहिल्यास लागलीच येतो.

आता हेच पहा ना... ब्रह्मदेवाचा आणि स्थानिक भाषेत मुरुंबदेवाचा डोंगर म्हणून ओळखला जाणारा एक छोटेखानी किल्ला हाती आल्यावर त्याचं स्वराज्याच्या पहिल्या राजधानीत रूपांतर करुन शिवरायांनी आपल्या जाणतेपणाची आपल्या दूरदृष्टीची ओळखच पटवून दिलेली आहे. डोंगराला लागून असलेल्या रांगांवर बांधकाम करुन त्यांना माचीच स्वरूप दिलं आणि १२ चौरस मैलांचा परिसर राजगडाच्या पंखांखाली आणला.. या माच्यांची नावही किती सुंदर ठेवलीयेत. पद्मावतीचं मंदिर असलेली पद्मावती, पूर्वेकडे धावणारी सुवेळा आणि दक्षिण-पश्चिमेकडे जाणारी संजीवनी..

संजीवनीची बाजू म्हणजे राजगडाची सर्वात कमकुवत बाजू होती. म्हणजे या बाजूने हल्ला होणे अतिशय सोपं जाऊ शकेल अशी डोंगर-रांग. त्या कमकुवत, नाजूक भागाला कोरुन अजस्त्र भिंती उभ्या करुन , त्यातून निघालेल्या पत्थरांमधून संजीवनी माचीचं दुहेरी बांधकाम करणं , त्याला चिलखती बुरुजांची माळ घालणं आणि एकूणच या भागाला अवघड, अभेद्य बनवणं... काय ते काम, काय ती दृष्टी... नाजूक भागाला पत्थरांचा साज लेवून किल्ल्याची सर्वात भक्कम बाजू बनवून, किल्ल्याला नाव-संजीवनीच मिळाली म्हणा ना...

तुम्ही पहिली असेलच ना ही जागा? तुमचा अनुभव नक्की सांगा.. कारण, ही जागाच इतकी खास आहे की, जगत राहावं वाटतं, इथं पुन्हा पुन्हा येण्यासाठी..

We all are Proud to have a King like Chatrapati Shivaraay, certainly so.. we should be proud of our beloved King for his visions for Swarajya and the way he planned his dreams and accomplished them.
We can easily get to understand his vision by looking at his life..

To give an Example, look at Rajgad, a small watch post on hill named Murumdev Hill, which he converted to be a Huge fort and the First Capital of Maratha Kingdom. and we should always look at the structure of this fort in Architectural perspective too.
The Extensions like, Suvela, Padmavati and Sanjivani has made it possible to bring around 12 sq. miles area under the wings of Rajgad.

The South Western ridge of the fort was the weakest link in the fort and it was very easy to conquer the fort from this side for enemies. However, Shivchatrapati had a vision for this place, he got it carved to be a huge rock wall, he got the double walled fortification built with the carved stone and made it so strong it this part became impossible to conquer.
This vary place, which was once the weakest link of the Fort, added life to the Fort and hence, the name, Sanjivani.

You also, might have been to this place, if yes, do share your experience.

Address

Via Ferrata Adventure Solutions
Ratnagiri
411030

Opening Hours

Monday 10am - 10pm
Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm

Telephone

9850887432

Alerts

Be the first to know and let us send you an email when कोकण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to कोकण:

Shortcuts

Share