Fortune Club

Fortune Club Fortune Club offers services like Tours and Traveling in Sangamner. Our target is to give more satis

सर्वानां दस-याच्या हार्दिक शुभेच्छा.
22/10/2015

सर्वानां दस-याच्या हार्दिक शुभेच्छा.

29/09/2015

फाॅर्च्युन क्लब

महिन्द्रा एक्सयुव्ही 500 डब्ल्यू 4

@ 12 प्रती किमी With AC

@ संगमनेर

राजेश काळे

9673681357

22/06/2015

पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे. रिमझिम बरसलेल्या पावसामुळे मुंबईकरांची मान्सून पिकनिकची तयारी सुपरफास्ट ट्रॅकवर आहे.
कैक फुटांच्या उंचीवरून येणारे फेसाळते पाणी अंगावर घेण्याची मजा काही औरच असते. लोणावळा, खंडाळा, माळशेज घाट यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणांबरोबरचं जवळपासचे धबधबे शोधण्याची जोरदार धावपळ सुरू झालीये.

⛳- भिवपुरी - माथेरानच्या कुशीत असलेले हे ठिकाण मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. भिवपुरी रेल्वे स्टेशनजवळ हॉटेल्स आहेत. गावकर्‍यांना सांगितल्यास ते जेवणाची सोय करतात.

⛳- चिंचोटी - इथे पोहोचताना हिरव्या झाडाझुडपाच्या दाटीतून जावं लागतं. या मार्गावर ठिकठिकाणी धबधबे पाहायला मिळतील. मुख्य धबधब्याजवळ पोहचायला सुमारे तासभर चालावं लागतं. दहिसर टोलनाक्यानंतर ‘कामन’ जंक्शनजवळ हे ठिकाण आहे. ट्रेनने जायचं असेल तर नायगाव स्टेशनला उतरून रिक्षाने जावे लागते.

⛳- तुंगारेश्वर - नदी आणि धबधबा अशा दोन्ही ठिकाणचा आनंद घेता येतो.
मुंबईपासून सुमारे २ तासांच्या अंतरावर तुंगारेश्वर आहे. पर्यटकांसाठी डोंगरावर कोणतीही जेवणाची व्यवस्था नाही.

⛳- रांधा फॉल - सह्याद्रीच्या पर्वतरांगात विल्सन डॅमपासून तयार झालेला हा धबधबा. या ठिकाणी जाण्यासाठी गाडी हा एकमेव पर्याय आहे. इगतपुरीजवळ असलेल्या विल्सन डॅमजवळ हा धबधबा आहे. या ठिकाणी जेवणासाठी हॉटेल्सची सोय नसली तरी इगतपुरीजवळ जेवणाची व्यवस्था होते.

⛳- पांडवकडा - खारघर परिसरात पांडवकडा हा धबधबा गेल्या दहा वर्षांत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांच्या लीस्टमध्ये अग्रभागी आहे. या धबधब्यावर जाण्यास बंदी घातली असली तरी अनेक पर्यटक पांडवकड्याला भेट देतात. आजूबाजूच्या डोंगराने नेसलेला हिरवाकंच शालू पर्यटकांना भुरळ घालत असतो. हार्बर रेल्वे मार्गावरील खारघर स्टेशनवरून या ठिकाणी जाता येते.

⛳- झेनिथ - खोपोली शहरापासून २ किमीवर असलेल्या झेनिथ धबधब्याच्या पाण्याचा फोर्स खूप आहे, पण तरीही तरुणाईला पिकनिकसाठी झेनिथला जाण्याचा मोह काही आवरत नाही. म्हणूनच शनिवारी-रविवारी या धबधब्यावर मोठी गर्दी होत असते. इथल्या प्रत्येक कोपर्‍यावर पंजाबी धाबे आहेत.

⛳- पळसदरी - मुंबई-पुणे महामार्गावरच्या चौक फाट्यापासून १८ किमी दूर आणि पळसदरी रेल्वे स्टेशनपासून दोन किमी अंतरावर पळसदरी धबधबा आहे.
रेल्वेमार्गाचा पर्याय असल्याने या ठिकाणी गर्दीचे प्रमाण जास्त असते.
जेवणाची सोय या ठिकाणी होते.

⛳- गाढेश्वर - पनवेल तालुक्यात पावसाळी गर्दी गाढेश्वर नदीकाठी पाहायला मिळते. मनसोक्त डुंबण्यासाठी इच्छुक असणारे पर्यटक या ठिकाणी आवर्जून येतात.

⛳- फणसाड धबधबा - फणसाड अभयारण्यामधील या धबधब्यात चिंब होणं म्हणजे एक रोमहर्षक अनुभव आहे. या धबधब्यात सचैल स्नानानंतर अभयारण्यात पक्ष्यांचा किलबिलाट आणि झाडांची हिरवाई पाहण्यात एक वेगळा आनंद आहे.

⛳- सवतकडा - मुरुड-जंजिरापासून ११ किमी अंतरावरील सवतकडा धबधबा पर्यटकांनी शोधून काढला आहे. मुरुड-आगरदांडा रस्त्यावरील शिघ्रे गावातून सवतकड्याची पाऊलवाट जाते. या पाऊलवाटेवरून जाण्याचा थरार अविस्मरणीय आहे. जवळपास खाण्याची सोय नाही.

⛳- गवळीदेव - नवी मुंबईतील घणसोली गावाजवळ असणारा गवळीदेव धबधबाही आसपासच्या पर्यटकांना खुणावत आहे. शहराच्या इतक्या जवळ असूनही हा धबधबा आणि गवळीदेव डोंगर अनेक मूलभूत सोयीसुविधांपासूून वंचित आहे.

⛳- कोंडेश्वर - बदलापूरपासून सहा किलोमीटर अंतरावर कोंडेश्वरचा धबधबा आहे. इथे दोन धबधबे आहेत. बदलापूर पूर्वेकडून भोज-दहिवली शेअर रिक्षा उपलब्ध आहेत. कुंडात डोह असून त्यात कपार्‍या असल्याने येथे पाण्यात उतरताना पुरेशी खबरदारी घ्यावी लागते.

⛳- भगीरथ - वांगणीपासून चार किलोमीटर अंतरावर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरलेला भगीरथ धबधबा आहे. बेडीसगावापासून धबधब्याकडे जाण्यासाठी पायवाट आहे. या ठिकाणी जेवणाची सोय नाही.

⛳- टपालवाडी - नेरळ रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावर असणार्‍या आनंदवाडी आदिवासी वाडीजवळ यथेच्छ पोहण्यासाठी छान डोह असणारा एक धबधबा आहे. अलीकडच्या काळात पर्यटकांपैकीच कुणीतरी ‘टपालवाडीचा धबधबा’ असे त्याचे नाव ठेवले आहे. ठिकाण अतिशय निसर्गरम्य असले तरी येथे जेवण तसेच कोणतेही खाद्यपदार्थ मिळण्याची व्यवस्था नाही.

⛳- आषाणे - भिवपुरी-कर्जतदरम्यान भिवपुरीपासून पांच किमीवर असणार्‍या आषाणे गावाजवळील धबधबा हेही पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. इथे जाण्यासाठी भिवपुरीपासून रिक्षा मिळते. आषाणे ग्रामस्थ पर्यटकांना मागणीनुसार जेवण करून देतात.

⛳- थिदबीचा धबधबा - पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. कल्याण-माळशेज रस्त्यावर घाटाच्या पायथ्याशी साबर्णे गावापासून पुढे थिदबी गावापर्यंत ३ कि.मी.
कच्च्या रस्त्याने चालत जावे लागेल.

⛳- निवळी - निवळी घाट चढताना पर्यटकांना आकर्षित करतो तो हिरव्या दाट झाडीतून कोसळणारा धबधबा. निवळी धबधब्याचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी घाटातच पर्यटकांसाठी खास पॉइंट तयार करण्यात आला आहे. ज्या पर्यटकांना प्रत्यक्ष धबधब्याजवळ जायचे असेल त्यांच्यासाठी पायर्यांचा मार्ग तयार करण्यात आला आहे.

⛳- मोहिली धबधबा - कर्जतपासून ६ ते ७ किमीवर उल्हास नदी पार करून मोहिलीत प्रवेश होतो. डोंगरावरून भिरभिरणारा वारा, हिरवीगार वनराई असे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं, असे वाटते. धबधब्याजवळ थंड वातावरणात गरम गरम वाफाळता चहा आणि मक्याची कणसे खाण्याची मजाच काही औरच आहे.
लोणावळ्याचे भुशी धरण, त्यापुढे असणारी टायगर लीप दरी, या ठिकाणी पावसाळ्यात बरेच पर्यटक जातात. इथून जवळच असलेला कोरीगड, तैलबैला, घनगड, कैलासगड इत्यादीसारख्या किल्ल्यांना पावसाळ्यात भेट देण म्हणजे काही औरच मजा आहे. लोणावळ्याजवळील कार्ला-भाजे लेण्या, लोहगड, विसापूर, राजमाची, तुंग, तिकोन्याच्या वाटेने पुढे पौडमार्गे मुळशी धरणाला रस्ता जातो, तोच रस्ता खाली कोंकणात माणगाव-कोलाडला उतरतो. हाच तो ताम्हिणी घाट. मुळशी धरणाच्या काठाकाठाने जाणारा हा गाडी रस्ता अतिशय सुंदर असून एकीकडे धरणाचा पाणवठा आणि त्याचबरोबर उंच डोंगर आणि खोल दर्‍याचा देखावा एक अविस्मरणीय आनंद देतो.

⛳- माळशेजघाटाआधी मुरबाडजवळ असणारा 'पळूचा धबधबा' हे एक उत्तम स्थळ आहे. याच्यामागे असणारी भीमाशंकरची डोंगररांग पावसाळ्यात विलोभनीय दिसते आणि त्याचबरोबर आपण गोरखगड, सिद्धगड, मच्छिंद्रगड इत्यादी एक दिवसाचे ट्रेकसुद्धा करू शकतो.

⛳- ठाणे जिल्ह्यातील जव्हार म्हणजे डोंगरदर्‍या, असंख्य धबधबे, दूरवर पसरलेली भातशेती, यांनी नटलेले छोटेसे हिल स्टेशन. इथला हनुमान टेकडी, शिर्पा माळ, दाभोसा धबधबा ठिकाण पाहण्यासारखा आहे. कसारा घाटाअलीकडे बळवंतगड हा छोटासा किल्लादेखील पाहण्यासारखा आहे.

⛳- नाशिक त्र्यंबकेेशर परिसरात असणारे कावनई, गडगडा, त्रिंगलवाडी, हरिहर, बसगड, अंजनेरी इत्यादीसारख्या बर्‍याच किल्ल्यांची सैर पावसात करता येते.

⛳- ठाणे-नाशिक महामार्गावर आटगावहून तानसा आणि याच भातसा धारणाकडे जाणारा रस्ता आहे. इथेदेखील एक दिवसीय पावसाळी सहलीला जाता येईल. कळसुबाई, भंडारदरा आणि रंध धबधब्याला पावसाळ्यात भेट द्या. इथले अमृतेेशर मंदिर आवर्जून पाहण्यासारखं आहे. साम्रात गावाजवळील सांधण दरी अप्रतिम आहे. रतनगड किल्लादेखील याच परिसरात असून अनेक मंडळी रतनगड ते हरिश्चंद्रगड असा ट्रेकदेखील करतात.

⛳- धुळे- नंदुरबार इथून जवळ असलेल्या तोरणमाळ या ठिकाणची सुंदरता काही औरच आहे. इथले जंगल, डोंगर, दर्‍या, पक्षी, रंगीबेरंगी फुले आपले मन प्रसन्न करून टाकतील यात वादच नाही.

⛳- नाशिकच्या पुढेच असणार्‍या चाळीसगावाजवळील पावणादेवी आणि त्या परिसरातील जंगल हे पावसाळ्यात पर्यटनाचे आणखी काही पर्याय ठरू शकतात. इथे असलेला कण्हेरगड किल्ला आणि केदारेेश्वर धबधबा पाहण्यासारखा आहे.

⛳- चिखलदरा हे अमरावतीहून जवळ असणारे आणि विदर्भवासीयांचे आवडते ठिकाण. इथे असणारा गाविलगड किल्ला, किचकदरा यासारखी बरीच ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. चिखलदर्‍याहून जवळच्या मेळघाट व्याघ्रप्रकल्पाला नक्की भेट द्या.

⛳- सातारा जिल्ह्यातलं 'कासचे पठार' म्हणजे महाराष्ट्रातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. साधारण सप्टेंबर महिन्यात या पठारावर असंख्य विविधरंगी फुले फुलतात आणि त्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक इथे भेट देतात. कासबरोबरच सातार्‍याजवळ नदीकिनारी आणि जुन्या मंदिरांचा समूह असणार्‍या माहुली तसेच अजिंक्यतारा, सज्जनगड, ठोसेघर धबधबा पाहण्यासारखा आहे.
सातारहून ८ कि.मी. असणार्‍या कण्हेर धरणाला सुद्धा भेट देता येईल.

⛳- ट्रेकर्सनी पन्हाळगड ते विशाळगड हा पावसाळी ट्रेक नक्की करावा. मसाईचे विस्तीर्ण पठार, शेती, जंगल, ओढे, नदी, नाले, छोटी छोटी गावे अशा ठिकाणांहून हा ट्रेक पूर्ण होतो.

⛳- पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणार्‍या वाटेवर वरंधाघाट लागतो. वरंधाघाटा लगतच कावळ्या या किल्ल्यावर जाता येईल. डोंगरातून वाहणारे छोटे मोठे झरे, धबधबे, बाजूला खोल दरी आणि त्या दरीत दिसणारं छोटंसं गाव, आणि त्या गावालगत वाहणारी नदी असे वेड लावणारं सौंदर्य वरंधा घाटात आहे. वरंधा घाट उतरल्यावर शिवथरघळ इथली गुहा आणि त्या गुहेबाहेर पडणारा पाऊस, धबधबा म्हणजे क्या बात!

⛳- रायगड जिल्ह्यातील नागोठणेजवळील सुकेळी खिंडीजवळ खांबगाव नजीक सुरगड किल्ल्याला देखील भेट देणं छान वाटेल. मुंबईहून महाडकडे जाताना याच सुकेळी खिंडीपासून पायवाटेने साधारण २० मिनिटांनंतर एक उंच धबधबा दिसतो. त्या धबधब्याचं पाणी आणि नदी हे एक अतिशय सुंदर आणि सुरक्षित ठिकाण आहे.

⛳- रायगड जिल्ह्यात खोपोली पाली रस्त्यालगत दुरशेत गावाआधी उंबरखिंड हे स्थान आहे. खंडाळ्याच्या डोंगरातून पडणारे पाणी उंबरखिंडीत येते आणि नदीमार्गे कोकणात जाते. दुरशेतहून पुढे जांभूळपाड्यामार्गे भेलीव गावालगतचा मृगगड हा किल्ला आणि त्याकडे जाणारा नदीलगतचा मार्गही पर्यटकांना भुरळ पाडतो. गणपतीच्या पाली गावाआधी ठाणाळे हा लेणी समूह.

10/06/2015
03/06/2015

सर्व संगमनेरकरांसाठी खास सवलतीच्या दरात महिंद्रा एक्सयुव्ही छोट्या व मोठ्या सहली साठी भाडेतत्वावर मिळेल.
निर्व्यसनी व अनुभवी ड्रायव्हर.
नविन शोरुम गाडी व जास्त आरामदायक.
पुढे व मागे एसी, सुरक्षेसाठी एअर बँग.
जास्त रुंद टायर व उत्तम म्युझिक सिस्टम.
संपर्क
7385553018
9673681357
9881766114
9860100414

Arevare beach is located near Ganpatipule in Ratnagiri District of Maharashtra State, India. it is a safe and blue water...
23/05/2015

Arevare beach
is located near Ganpatipule in Ratnagiri District of Maharashtra State, India. it is a safe and blue water beach in Ratnagiri.

The word Arevare has a funny ring to it in Marathi. That there is a village by this name and it is blessed with a heavenly seashore with a clear view for miles across the blue waters was not known to many.

But thanks to the new, shorter road being built to connect Ratnagiri and Ganpatipule, Arevare has found a place for itself on the tourism map of Konkan.

The road at Arevare, hugs the seashore for a length of some 7 - 8 km and travels past a 100 feet high cliff, below which sea waves lap ferociously without pause.With no amenities available the tourists are greeted only by diving barren cliifs and sea gulls.

http://zeenews.india.com/marathi/news/maharashtra/bhaktnivas-at-ganpatipule/274901
20/05/2015

http://zeenews.india.com/marathi/news/maharashtra/bhaktnivas-at-ganpatipule/274901

गणपतीपुळ्यातील येणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी... गणपतीपुळ्यात राहण्यासाठी येणाऱ्या भक्तगणांची लूट आता थांबणार आहे. कारण आता गणपतीपुळ्यात येणाऱ्या पर्यटकांना चक्क २० रुपयांपासून ते ३०० रुपये मोजून आलिशान भक्तनिवासमध्ये राहता येणार आहे. ७३ खोल्यांचे आलिशान भक्तनिवासात ही सोय येत्या गुरुवार प…

11/04/2015

सर्व संगमनेरकरांसाठी खास सवलतीच्या दरात महिंद्रा एक्सयुव्ही छोट्या व मोठ्या सहली साठी भाडेतत्वावर मिळेल.
निर्व्यसनी व अनुभवी ड्रायव्हर.
नविन शोरुम गाडी व जास्त आरामदायक.
पुढे व मागे एसी, सुरक्षेसाठी एअर बँग.
जास्त रुंद टायर व उत्तम म्युझिक सिस्टम.
संपर्क
7385553018
9673681357
9881766114
9860100414

11/04/2015

Fortune Club offers services like Tours and Traveling in Sangamner. Our target is to give more satis

11/04/2015

सर्व संगमनेरकरांसाठी खास सवलतीच्या दरात महिंद्रा एक्सयुव्ही छोट्या व मोठ्या सहली साठी भाडेतत्वावर मिळेल.

निर्व्यसनी व अनुभवी ड्रायव्हर.

नविन शोरुम गाडी व जास्त आरामदायक.

पुढे व मागे एसी, सुरक्षेसाठी एअर बँग.

जास्त रुंद टायर व उत्तम म्युझिक सिस्टम.

संपर्क
7385553018
9673681357
9881766114
9860100414

Address

Sangamner
422605

Telephone

02425222337

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fortune Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share