09/09/2017
*नेव्हल ऍव्हएशन म्युझियम*
(गोवा दर्शन )
हे भारतातील एकमेव नेव्हल ऍव्हिएशन म्युझियम वास्को- बोगमाळो रस्त्यावर, बंदराचे शहर वास्को –द गामा पासून अवघ्या ६/७ कि.मी. अंतरावर वसलेलं आहे.हे अख्ख्या आशियातील या प्रकारचं एकमेव नेव्हल ऍव्हिएशन म्युझियम ऑक्टो.1998 मध्ये स्थापन झालं. याला अजून इतकी प्रसिद्धी न मिळाल्यामुळे गोव्यातील अनेक लोकांनी ते पाहिलेलं नाही.
अरबी समुद्राला सामोरं असणाऱ्या पठारावर हे वसलेलं आहे. इथून बोगमाळो किनारा दिसू शकतो. नेव्हल ऍव्हिएशन म्युझियम दोन विभागात वाटलेलं आहे. एक बाहेरच्या बाजूने खुल्या हवेत तर दुसरा आंतमध्ये आहे.
मुख्य गेट मधून आत शिरल्यावर अवघ्या परिसरावर नजर ठेवून उभ्या असलेल्या पहारेकऱ्यासारख्या प्रचंड “सुपर कोल्स्टिलेशन” च्या दृश्याने स्वागत होते. हे ऍअर क्राफ्ट प्रथम इंडियन ऍअर लायन्सने प्रवाशांना वाहून नेण्यासाठी वापरले होते. त्या नंतर ते क्राफ्ट वाहून नेण्यासाठी वायु सेनेच्या हवाली केले गेले. नंतर ते नॅव्हीने वायुसेने कडून उसने घेतले आणि अजून ते त्यांच्याच ताब्यात आहे, जरी कामात नाही..
जसे तुम्ही वस्तुसंग्रहालयाच्या बाहेरच्या विभागात प्रवेश कराल तुम्हाला सी हॉक सारखी वेगवेगळी ऍअर क्राफ्ट इंजिनं, हेलिकॉप्टर इंजिन , सीलॅंड ऍअर क्राफ्ट इंजीन आणि 60 त नेव्ही वापरत असलेलं जुनं फार इंजीन सुद्धा बघायला मिळेल. जसे तुम्ही थोडं पुढं जाल तुम्हाला वेगवेगळी सात ऍअर क्राफ्ट बघायला मिळतील.
सी हॅरिअर, डव्ह हे शत्रूच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी वापरलं जाणारं एकेरी बैठकीचं जेट फायटर, सी लॅंड हे हलक्या वाहतुकीसाठी वापरलं जाणारं दुहेरी इंजिनचं ऍअर क्राफ्ट आणि इतर कामं करणारं , जमिनीवर तसेच समुद्रावर धावण्याची दुहेरी भूमिका करणारं सीहॉक, व्हॅंपायर हे एक एकेरी इंजिनाचं जेट फायटर, ह्युजेस एक छोट्या बांधणीचं लगतच्या 2 बैठकांचे सैनीक प्रशिक्षक, ऍलीझ हे दोन लगतच्या बैठकांचे हॅलिकॉप्टर, 3 बैठकांचे वाहक पाणबुडी विरोधी आणि शत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी वापरले जाणारे ऍअर क्राफ्ट ही सात प्रकारची एअर क्राफ्ट आहेत.
तुम्ही संग्रहालयाच्या आतल्या विभागात प्रवेश केल्यावर ऍअर क्राफ्ट वाहू आयएनएस विराट मध्ये प्रवेश केल्याचा भास होतो. कारण कॉरिडोरच्या दोन्ही बाजूंना विराटच्या आतल्या भागाचे चित्रण केलेलं आहे. त्यामुळे समुद्रात विराटवर आसल्याचं वातावरण निर्माण होतं. इतर दोन खोल्याही जहाजाची कल्पना करूनच आखलेल्या आहेत.
तुमच्या डाव्या बाजूला एका खोलीत सगळी शस्त्रास्त्रं नीट लावून ठेवली आहेत. इथं तुम्हाला टोरपेडो, वेगवेगळ्या आकाराचे बॉम्ब, रॉकेट, हत्यारे, क्षेपणास्त्रे, पाणबुडीला उडवून लावणारा दारूगोळा वगैरे जवळून पाहाता येतं.
तुम्ही शस्त्रास्त्रांच्या खोलीतून बाहेर आल्यावर तुम्हाला सोनोबॉय रूम मिळेल. सोनोबॉय म्हणजे पाण्याखालील शत्रूचे लक्ष्य शोधून काढण्यासाठी ऍअरक्राफ्ट कडून वापरण्यात येणारे सेंसर्स.
सुरक्षा खोलीत कोणत्याही धोक्यात आणि घटनेत नौदल कर्मचाऱ्यां कडून समुद्रात आणि हवेत असताना वापरण्यात येणारी वेगवेगळी गॅझेट, सुरक्षा गियर ठेवलेली आहेत. इथे फ्लोटिंग डिग्नी पॅरॅशूट, फायटर पायलट्स इजेक्सन सीट, पायलटचा पोशाख वगैरे ठेवलेलं आहे.
जरा पुढे मल्टिमिडिया रूम आहे. त्यात सिम्युलेटर आहे. इथं मुलं तसेच मोठे सुद्धा सिम्युलेटर मध्ये जेट फायटर वैमानिकाच्या बसण्याच्या जागेचा अनुभव घेऊ शकतात.
तुम्ही कॉरिडर मधून त्या जागेचं सौंदर्य न्याहाळीत जात असताना तुम्हाला 1958 ते 1997 वर्षामध्ये मातृभूमीसाठी विमान चालवताना जीव त्यागलेल्या सैनिकांना श्रद्धांजली देणारी “श्रद्धांजली” ग्रेनायटची शिला भिंत सजवताना दिसून येते.
याला लागूनच हॉल ऑफ सायलन्स नावाचं संग्रहालयाचे मर्मस्थान आहे. ही साधनेची खोली आहे. ही जागा प्रसन्न, थंड आणि शांत आहे. एक निळ्या रंगातील सुंदर चित्र ग्रॅनायटने बांधलेल्या एका भिंतीवर शोभून दिसतं.
मोठ्या दालनात छायाचित्राचा कोपरा आहे. इथं नौदलाचा 1959 पासूनची ऍव्हिएशन हिस्ट्री दाखवणारी जुनी छायाचित्रे आणि तळटिपा आहेत. ऑपरेशन विजय ह्या गोव्याच्या मुक्ती लढ्यातील कृष्णधवल छायाचित्रे इथे लावलेली आहेत.
तुमच्या वस्तुसंग्रहालयाच्या भेटीत छोट्या म्युझियम सुव्हेनिर शॉपमध्ये जाण्याचे विसरू नका. त्यात पेन ते की-चेन, कातडी पाकीट, आणि कॅप, टी-शर्ट ठेवलेले आहेत. त्यातून ह्या सुंदर स्थळाची आठवण म्हणून एखादी वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकता.
हे नॅव्हल एव्हिएशन म्युझियम कित्येक मैल जाऊन पाहाण्या लायक आहे. यातून युवकासाठी संरक्षण क्षेत्रात जाण्यासाठी मिळणारी प्रेरण आणि ज्ञान मिळू शकतं. या वस्तुसंग्रहालयाला दिलेली भेट अवघ्या दोन कि.मी. अंतरावर असणाऱ्या “हॉलंट बीच” ह्या नयनरम्य स्थळावर सहल आयोजीत करून संपवू शकता. मग चला तर न पाहिलेला गोवा पाहयला .
सहल तुमची सेवा आमची
*सिद्धिविनायक टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल,सर्व्हिसेस,सांगली*
९६०४३५१११,९९७५२४३३३३,९०२१६७५५५५ .
https://www.facebook.com/sts.sangli/