10/12/2017
:: कोल्हापूर जिल्हा (जगात भारी आम्ही कोल्हापुरी) - माहिती ::
देश : भारत.
राज्य : महाराष्ट्र.
विभागाचे नाव : पुणे विभाग.
क्षेत्रफळ : ७,६८५ चौकिमी (२,९६७ चौमैल).
एकुण लोकसंख्या : ३८,७६,००१.
घनता : ५००/चौकिमी (१३००/चौमैल). शहरी घनता १८०४, ग्रामीण घनता ३२७.
प्रमुख मार्ग : NH-4, NH-204
साक्षरता दर : ८९%
लिंग गुणोत्तर : १.०४ ♂/♀
लोकसभा मतदारसंघ : कोल्हापूर, हातकणंगले.
विधानसभा मतदारसंघ : चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ.
एकूण तालुके(१२) : गडहिंग्लज, करवीर, कागल, गगनबावडा, आजरा, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले.
बोलीभाषा : मराठी.
भौगोलिक स्थान :
कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा आहे. त्याच्या पश्चिम-नैर्ऋत्येला सिंधुदुर्ग जिल्हा, पश्चिम-वायव्येला रत्नागिरी जिल्हा, उत्तर-ईशान्येला सांगली जिल्हा तर दक्षिणेला
कर्नाटकमधील बेळगाव जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची रांग असून तेथील भाग डोंगराळ आहे. भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचे पश्चिम रांग, मध्य रांग आणि पूर्व रांग असे तीन विभाग मानले जातात. मध्य आणि पूर्व भागातील माती अग्निजन्य खडकापासून बनली असल्याने काळ्या रंगाची आहे तर पश्चिम भागात घाटातील डोंगराळ भागातील जांभ्या खडकापासून बनलेली लाल माती आहे. या भागातील बहुतेक जमीन जंगलाने व्यापली आहे.
इतिहास :
कोल्हापूर ज्या मूळ गावापासून विस्तार पावले ते गाव ब्रह्मपुरी होय. इतिहासकारांच्या मतानुसार कोल्हापूर जिल्हा परिसरावर आंध्रभृत्य, कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, देवगिरीचे
यादव व बहामनी अशा अनेक राजवटींचा अंमल होता. कोल्हापूरच्या आसपास केलेल्या उत्खननात, तेथील पुरातन अवशेषांवर सातवाहनकालीन व बौद्ध धर्माच्या खुणादेखील आढळल्या आहेत.
कोल्हापूर परिसरावर विजापूरच्या आदिलशहाची अनेक वर्षे सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मार्च १६७३ मध्ये पन्हाळा जिंकून स्वराज्यात आणला, तसेच १६७५ मध्ये
कोल्हापूर परिसर खर्या अर्थाने जिंकून आपल्या अखत्यारीत आणला. पुराणानुसार कोल्हासूर या राक्षसाचा महालक्ष्मी देवीने वाढ केल्यामुळे या शहराला कोल्हापूर हे नाव पडले .
हवामान :
- पर्जन्यमान : सरासरी ७७८ मिलिमीटर.
- तापमान : कमाल ३८.७ व किमान १९.६.
- कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्वेकडील भागात कोरडे तर पश्चिम घाटातील भागांत थंड हवामान असते. जिल्ह्यात पाऊस मुख्यपणे जून ते सप्टेंबर या काळात नैर्ऋत्य मोसमी वार्यांमुळे मिळतो,
एप्रिल आणि मे महिन्यांत वळिवाचा पाऊसही पडतो. जिल्ह्यातील पश्चिमेकडील भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. येथील गगनबावड्यामध्ये वार्षिक सरासरी ५,००० मि.मी. पाऊस असतो.
त्यामानाने पूर्वेकडील तालुक्यांमध्ये कमी म्हणजे वार्षिक सरासरी ५०० मि.मी. पाऊस असतो.
प्रमुख उद्योग :
गूळ उद्योग, कोल्हापुरी चपला बनवण्याचे बरेच कारखाने, शेती व शेतीशी संबंधित व्यवसाय, लोहकाम, वस्त्रकाम, यंत्रमाग व हातमाग, विडी उद्योग, चांदीवरील कलाकुसरीच्या काम, इचलकरंजी वस्त्रोद्योग (महाराष्ट्राचे मँचेंस्टर), दूध, चित्रपट.
प्रमुख पिके :
तंबाखू, भात, ऊस, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी, नाचणी, ज्वारी, गहू, तूर.
नद्या :
पंचगंगा, वारणा, दुधगंगा, वेदगंगा, भोगावती, हिरण्यकशी आणि घटप्रभा ह्या मुख्य नद्या आहेत ज्या पूर्व – पश्चिम घाटातून वाहतात. कुंभी, कासारी, तुळसी व भोगावती ह्या नद्यांच्या
संगमातुन पंचगंगा नदी तयार झाली आहे. जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून पूर्वेकडे कृष्णा नदी वाहते तसेच तिल्लरी नदी पश्चिम सीमेवरुन पश्चिमेकडे वाहते.
संशोधन केंद्रे :
- भात संशोधन केंद्र (राधानगरी), फळ संशोधन केंद्र (आजरा), ऊस संशोधन केंद्र (कोल्हापूर).
- कृषीविषयक आवश्यक माहितीचा प्रचार यांसाठी इंटरनेटने जोडलेले देशातील पहिले गाव म्हणजे जिल्ह्यातील वारणा हे होय.
पर्यटनस्थळे :
- भवानी मंडप, महालक्ष्मी मंदिर, शालिनी पॅलेस, रंकाळा, न्यु पॅलेस, टाऊन हॉल, चंबुखडी, खासबाग कुस्ती मैदान, दसरा चौक, राजारामपुरी, छत्रपती शाहू पॅलेस, पापाची तिकटी, पंचगंगा नदी घाट.
- जोतिबा डोंगर.
- पन्हाळगड किल्ला, पन्हाळा.
- राधानगरी धरण, दाजिपूरचे अभयारण्य, काळमवाडी धरण.
- बाहुबली, रामलिंग, कुंथुगिरी.
- शंकराचार्य मठ, देव त्र्यंबोली, विशाळगड गड, कासव मंदीर पैजारवाडी, मसाई पठार, आंबा घाट, आंबोली घाट, फोंडा घाट.
- कोटितीर्थ, कत्त्यानी देवी, काशी विश्वेश्वर, कणेरी मठ, सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय.
- बरकी धबधबा, राऊतवाडी धबधबा, आंबोली धबधबा, गगनबावडा.
- नृसिंह सरस्वतींचे मंदिर / दत्त महाराज मंदिर, नरसोबाची वाडी/नृसिंहवाडी.
- कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर.
वाहतुकीच्या सोयी :
- खाजगी वाहने, बस, रेल्वे, रिक्षा, विमान(प्रस्तावित).
- महत्त्वाच्या शहरांपासून कोल्हापूर शहराचे किलोमीटरमध्ये अंतर - मुंबई-३९५, पुणे-२३५, नागपूर-९१०, औरंगाबाद-४६०, रत्नागिरी-१२९.
विशेष खरेदी :
कोल्हापुरी चपला, कोल्हापुरी मिरची, कोल्हापुरी साज, कोल्हापुरी फेटा, कोल्हापुरी गूळ, वस्त्र.
खाद्यसंस्कृती :
मटणाचा तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ पाव, वडापाव, लोणची, कोल्हापूरचा पिवळा धम्मक गूळ, मसाले, भेळ.
प्रमुख साखर कारखाने :
१. भोगावती सहकारी साखर कारखान, परिते(शाहूनगर), करवीर
२. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, दत्तनगर, शिरोळ
३. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, शाहूनगर, कागल
४. दत्त सहकारी साखर कारखाना, आसुर्ले पोर्ल, पन्हाळा
५. दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना, हलकर्नी, चंदगड
६. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना, बिद्री, कागल
७. गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना, हरळी, गडहिंग्लज
८. कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना, कुडीत्रे, करवीर
९. दे.भ.रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना, गंगानगर, हातकणंगले
१०. तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना, वारणानगर, पन्हाळा
११. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना, कसबा बावडा, करवीर
१२. जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, हुपरी, हातकणंगले
१३. आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, गवसे, आजरा
१४. सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना, हमीदवाडा, कागल
१५. शरद सहकारी साखर कारखाना, नरंदे, हातकणंगले
जिल्ह्यातील काही प्रसिद्ध व्यक्ती :
छत्रपती शाहू महाराज, वीर शिव काशीद, सदाशिवराव मंडलिक, कुशल बद्रिके, माधवराव बागल, विष्णू वासुदेव नारळीकर, बी.बी. निंबाळकर, बाबुराव पेंटर, देवदत्त दाभोलकर, रमेश देव
, बाळासाहेब देसाई, डी.वाय.पाटील, कुलदीप पवार, बाबुराव पेंढारकर, सुधीर फडके, एम.व्ही.धुरंधर, उदयसिंगराव गायकवाड, संभाजी राजे, निलेश साबळे, निवेदिता माने, वसंत सरोदे, व्ही. शांताराम, अयुब शेख, वीरधवल खाडे, जगदीश खेबुडकर, गोविंदराव टेम्बे, विजय तेंडुलकर, धनंजय महाडिक, भारती वैशंपायन, मास्टर विनायक, विश्वास नांगरे-पाटील, डॉ. बापूजी साळुंखे, बाबा कदम, वसंत शिंदे, राम कदम, उमा भेंडे, आशुतोष गोवारीकर, जयंत नारळीकर, शिवाजी सावंत, सूर्यकांत मांडरे, चंद्रकांत मांडरे, अन्य ३०+.
महत्वाच्या शैक्षणिक संस्था :
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, न्यू कॉलेज, शहाजी लॉ कॉलेज, डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटी, राजाराम कॉलेज, विवेकानंद महाविद्यालय, कमला कॉलेज, केआईटी कॉलेज, अन्य २०+.
नाट्यगृहे:
केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर.
- © टेक्नोएक्झाम एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे. www.technoexam.com
*******************
लेटेस्ट अपडेट्स साठी आपण टेक्नोएक्झाम चे अधिकृत चॅनेल्स जॉईन करू शकता:
१. TELEGRAM चॅनेल : https://goo.gl/qJJPPL
२. WHATSAPP चॅनेल : https://goo.gl/aEnjH2
या लिंकवर जाऊन रजिस्टर करा.
*******************