Konkani Ranmanus

Konkani Ranmanus Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Konkani Ranmanus, Tulas, Savantvadi.

गेल्या महिन्यात केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील सह्याद्रीतल्या एका गावात जाण्याचा योग आला. तिथे कोकणातल्या देवराई राखणदार सं...
12/05/2026

गेल्या महिन्यात केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील सह्याद्रीतल्या एका गावात जाण्याचा योग आला. तिथे कोकणातल्या देवराई राखणदार संस्कृतीचं आणखी खोल आणि जिवंत रूप अनुभवायला मिळालं.

ही भूमी म्हणजे फक्त जंगल नाही, तर माणसाला जगण्यासाठी लागणारं पाणी निर्माण करणारी, हजारो प्रकारच्या बिया आपल्या कुशीत रुजवणारी आई माऊली आहे. कोकणात जिचं रूप ‘सातेरी’ म्हणून जपलं गेलं, तीच देवी केरळ आणि कर्नाटकात वारुळात, नागाच्या रूपात, जंगलाच्या रूपात पूजली जाते.

तिथल्या लोकांसाठी जंगल म्हणजे resource नाही तर जिवंत देवस्थान आहे. त्या प्राचीन जंगलांना ते “कावू” म्हणतात, Sacred Groves. जिथे शेकडो वर्षे कुऱ्हाड गेली नाही, जिथे माती अजूनही जिवंत आहे, जिथे झऱ्यांचा जन्म होतो, जिथे पक्षी, साप, वाघ, किटक आणि माणूस एका अदृश्य कराराने एकत्र राहतात.

त्या कावूंमध्ये ऐकायला मिळणाऱ्या नागदेवता, वाघरक्षक, देवचार यांसारख्या लोककथा केवळ अंधश्रद्धा नाहीत, तर जंगल वाचवण्यासाठी समाजाने तयार केलेली सांस्कृतिक सुरक्षा व्यवस्था होती असं जाणवतं. आज विज्ञान सांगतं की Sacred Groves मुळे पाणी टिकतं, जैवविविधता टिकते, हवामान संतुलित राहतं. आपल्या पूर्वजांनी हे हजारो वर्षांपूर्वी समजून घेतलं होतं.

कोकणात जसं “देवराईत काही तोडायचं नाही” ही भावना होती, तशीच केरळमध्ये “कावू” बद्दल आहे. म्हणूनच अजूनही तिथे काही ठिकाणी हजारो वर्षांची जैवविविधता शिल्लक आहे.

राखणदार चळवळीसाठी हे समजून घेणं खूप महत्त्वाचं वाटतं. कारण अखंड भारताच्या जल-जंगल-जमिनीला पूजणाऱ्या संस्कृतीची मुळं ही अशाच लोकांमध्ये आहेत, आदिवासी, मच्छीमार, ग्रामीण समाज आणि जंगलाशी नातं न तोडणारे लोक.

केरळची लोककथा, आदिवासी संस्कृती, मच्छीमारांचं जीवन, खाद्यसंस्कृती, हे सगळं कोकण पट्टी समजून घेण्यासाठी एक मोठं विद्यापीठ आहे. सह्याद्री एकच आहे… मातीचा रंग बदलतो, भाषा बदलते, पण निसर्गाशी नातं जोडण्याची संस्कृती सारखीच वाटते.

आणि या सगळ्यात मध्ये एखाद्या कौलारू छोट्याशा घरातल्या toddy shop मध्ये बसून ताजी ताडी पित, गरम अप्पम खात, बाहेर पडणारा पाऊस आणि नारळांच्या झावळ्या बघत अनुभवलेलं सुशेगाद केरळ अजून जवळचं वाटतं. त्या साध्या जगण्यातही निसर्गाशी जोडलेली एक शांत लय जाणवते.

आज विकासाच्या नावाखाली जंगल, डोंगर, पाणी आणि गावं नष्ट होत असताना या देवराई राखणदार संस्कृतीकडून पुन्हा शिकण्याची गरज आहे. कारण जंगल वाचवणं म्हणजे फक्त झाडं वाचवणं नाही, तर भविष्यात माणूस म्हणून जगण्याची शक्यता वाचवणं आहे.

10/05/2026

जीवनशाळेत आम्ही प्लास्टिकमुक्त अन्नपदार्थ निर्मितीचा एक छोटासा पण महत्त्वाचा प्रयत्न करत आहोत.
आमच्या शेतीत रासायनिक खतांचा वापर नाही, कोणत्याही फवारण्या नाहीत. कमी का होईना, पण विषमुक्त गावठी पीक आम्हाला शेतातून मिळतं. पण फक्त पिकवणं पुरेसं नाही, त्या अन्नाची गुणवत्ता टिकवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच अन्न सुकवण्यासाठी, साठवण्यासाठी आणि वापरण्यासाठी आम्ही प्लास्टिकऐवजी पारंपरिक लाकडी आणि बांबूच्या वस्तूंचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

नमस्कार 🙏तुमच्या प्रेमामुळे, मेसेजेसमुळे आणि पाठिंब्यामुळे आम्हाला खूप ताकद मिळते आहे. अनेक जण संपर्क करत आहेत, प्रत्येक...
08/05/2026

नमस्कार 🙏
तुमच्या प्रेमामुळे, मेसेजेसमुळे आणि पाठिंब्यामुळे आम्हाला खूप ताकद मिळते आहे. अनेक जण संपर्क करत आहेत, प्रत्येकाची नोंद आम्ही घेत आहोत आणि योग्य वेळी सर्वांशी संपर्क साधला जाईल.

कोकणासाठी मनापासून काहीतरी करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने आता एकत्र येण्याची गरज आहे. काही तरुण मित्रांसोबत मिळून आम्ही शांतपणे पण ठोस काम उभं करण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी थोडा वेळ लागेल, पण लवकरच नव्या स्वरूपात तुमच्यासमोर येऊ.

सोबत राहा.
कोकणासाठी, निसर्गासाठी आणि आपल्या मातीतल्या अस्तित्वासाठी.

गोवा…‘सातेरीच्या राखणदारांची’ भूमी आज संकटात उभी आहे.तांबड्या मातीचा सुगंध, हिरव्यागार जंगलांची सावली, निळ्याशार म्हादईच...
08/05/2026

गोवा…
‘सातेरीच्या राखणदारांची’ भूमी आज संकटात उभी आहे.
तांबड्या मातीचा सुगंध, हिरव्यागार जंगलांची सावली, निळ्याशार म्हादईचं पाणी आणि समुद्राच्या मिठासारखी साधी माणसं, ही स्वर्गीय गोयभूमी आज ओरबाडली जाते आहे.

डोंगर फोडले जातायत, जंगलं विकली जातायत, नद्या अडवल्या जातायत…आणि विकासाच्या नावाखाली भूमीचा आत्माच हरवत चाललाय.

एक काळ असा होता, जेव्हा गोवा आणि तळकोकण वेगळे नव्हते.
ही माती, ही भाषा, ही देवसंस्कृती, ही लोकपरंपरा, सगळं एकाच नाळेने जोडलेलं होतं. माझं मूळ गावही आजच्या गोव्यातील पेडणे तालुक्यातलं कोरगाव…नाग गावडा आमचा राखणदार.

आम्ही बारा पाचाची गाव-रहाटी, सातेरी-लैराईच्या भूमिकेची लेकरं.
देवाला केवळ मंदिरात नाही, तर मातीच्या रूपात पूजणारी माणसं.

आज तीच आई संकटात आहे, म्हणूनच तिच्या रक्षणासाठी उभ्या असलेल्या गोव्यातील राखणदारांना भेटायला आलो आहे कारण ही लढाई फक्त गोव्याची नाही…ही संपूर्ण कोकणाच्या अस्तित्वाची लढाई आहे.

जल, जंगल, जमीन आणि संस्कृती वाचवण्यासाठी, गोवा–कोकण पुन्हा एकदा एकत्र येण्याची वेळ आली आहे.

कारण माती वाचली तरच आपली ओळख वाचेल.

जीवनशाळेत आम्ही प्लास्टिकमुक्त अन्नपदार्थ निर्मितीचा एक छोटासा पण महत्त्वाचा प्रयत्न करत आहोत.आमच्या शेतीत रासायनिक खतां...
07/05/2026

जीवनशाळेत आम्ही प्लास्टिकमुक्त अन्नपदार्थ निर्मितीचा एक छोटासा पण महत्त्वाचा प्रयत्न करत आहोत.

आमच्या शेतीत रासायनिक खतांचा वापर नाही, कोणत्याही फवारण्या नाहीत. कमी का होईना, पण विषमुक्त गावठी पीक आम्हाला शेतातून मिळतं. पण फक्त पिकवणं पुरेसं नाही, त्या अन्नाची गुणवत्ता टिकवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच अन्न सुकवण्यासाठी, साठवण्यासाठी आणि वापरण्यासाठी आम्ही प्लास्टिकऐवजी पारंपरिक लाकडी आणि बांबूच्या वस्तूंचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

तुळस गावातील भीमनगर वाडीतील कुशल कारागीर महिलांनी बनवलेल्या बांबूच्या जीवनावश्यक वस्तू आम्ही जीवनशाळेत वापरतो.
होय…ज्या हातांना वर्षानुवर्षे जातीव्यवस्थेने अस्पृश्य ठरवलं, त्याच हातांनी बनवलेल्या नैसर्गिक वस्तूंमध्ये आमचं अन्न तयार होतं. आणि हीच खरी आपल्या भूमीची परंपरा आहे.

बांबूच्या टोपल्या, डाळी, हडगी, बांबू चटया अशा अनेक वस्तू त्या प्रेमाने तयार करतात. ही केवळ हस्तकला नाही, तर शाश्वत जीवनपद्धतीचं ज्ञान आहे.

“सातेरीची आम्ही लेकरं सगळी, दांडेकर आमचा राखणदार…”
या भावनेतून जीवनशाळा ग्रामस्वराज्याच्या तत्वांवर आधारलेली कोकणातील सामुदायिक गावसंस्कृती जपण्याचा प्रयत्न करते आहे.

स्वतःसाठी, आपल्या मुलांसाठी प्लास्टिकमुक्त, खतमुक्त, नैसर्गिक आणि गुणवत्तापूर्ण अन्न तयार करण्याची कला पुन्हा शिकण्याची ही वेळ आहे.

सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक, माणगाव येथे आयोजित छावणीमध्ये मला मुलांशी शाश्वत जीवनशैली, पर्यावरण आणि नैसर्गिक शेती या वि...
04/05/2026

सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक, माणगाव येथे आयोजित छावणीमध्ये मला मुलांशी शाश्वत जीवनशैली, पर्यावरण आणि नैसर्गिक शेती या विषयांवर संवाद साधण्याची संधी मिळाली. काल सायंकाळी स्मारकात विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांच्या डोळ्यांतील जिज्ञासा आणि विषयाबद्दलची प्रामाणिक आस्था विशेष जाणवली. नैसर्गिक शेती, पर्यावरण संवर्धन, हवामान बदल आणि वाढत्या पर्यावरणीय संकटांवर आपण सर्वांनी एकत्रितपणे चिंतन केले. या विषयांबद्दलची जाणीव आणि संवेदनशीलता प्रत्येक शाळेत रुजवणे अत्यंत गरजेचे आहे, विशेषतः कोकणातील मुलांमध्ये, जे निसर्गाशी घट्ट जोडलेले आहेत.

Ranmanis Foundation अंतर्गत "राखणदार" सारख्या उपक्रमांद्वारे आम्ही ही जाणीव जागृत करण्याचे आणि निसर्गाशी सुसंवाद साधणारी पिढी घडवण्याचे काम सातत्याने करत राहू.

सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक, माणगाव येथे आयोजित छावणीमध्ये मला मुलांशी शाश्वत जीवनशैली, पर्यावरण आणि नैसर्गिक शेती या वि...
04/05/2026

सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक, माणगाव येथे आयोजित छावणीमध्ये मला मुलांशी शाश्वत जीवनशैली, पर्यावरण आणि नैसर्गिक शेती या विषयांवर संवाद साधण्याची संधी मिळाली.

काल सायंकाळी स्मारकात विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांच्या डोळ्यांतील जिज्ञासा आणि विषयाबद्दलची प्रामाणिक आस्था विशेष जाणवली. नैसर्गिक शेती, पर्यावरण संवर्धन, हवामान बदल आणि वाढत्या पर्यावरणीय संकटांवर आपण सर्वांनी एकत्रितपणे चिंतन केले.

या विषयांबद्दलची जाणीव आणि संवेदनशीलता प्रत्येक शाळेत रुजवणे अत्यंत गरजेचे आहे, विशेषतः कोकणातील मुलांमध्ये, जे निसर्गाशी घट्ट जोडलेले आहेत.

रानमानुस फाउंडेशन अंतर्गत "राखणदार" सारख्या उपक्रमांद्वारे आम्ही ही जाणीव जागृत करण्याचे आणि निसर्गाशी सुसंवाद साधणारी पिढी घडवण्याचे काम सातत्याने करत राहू.

01/05/2026

व्हिडिओंपलीकडे एक नवीन सुरुवात… 🌿

चळवळ उभी राहते आहे
जल • जंगल • जमीन साठी ✊🏽

“राखणदार सिंधुको”
कोकणाच्या मातीशी, समुद्राशी आणि लोकजीवनाशी जोडलेली एक जिवंत गोष्ट.

परत आलोय…
फक्त कंटेंट बनवायला नाही,
तर आपल्या निसर्गाच्या बाजूने उभं राहायला.

https://www.linkedin.com/company/ranmanus-foundationRanmanus Foundation is now on LinkedIn 🌍In a rapidly changing world,...
16/04/2026

https://www.linkedin.com/company/ranmanus-foundation

Ranmanus Foundation is now on LinkedIn 🌍

In a rapidly changing world, we cannot remain limited to our regions. It is time to stand globally, to share our ideas, our values, and our perspective with those who seek meaning, sustainability, and truth.

At a time when climate change is no longer a distant concern but a lived reality, we must come together to protect what sustains us. Nature is not separate from us, it is our foundation, our future, and our responsibility.

Now is the time to bring Kokan to the global stage, its challenges, its struggles, and its untold realities. The world needs to see beyond the surface and understand the truth.

Kokan is not just a place in India, It is a living example of rich biodiversity, deep-rooted culture, and a sustainable way of life.

We are here to represent it.
We are here to protect it.
We are here to preserve and restore nature.
We are here to share its story with the world.

Let’s connect. Let’s collaborate. Let’s act for our planet and build something meaningful together.

-Founder Prasad Gawade

11/01/2026

निसर्गाकडून शिका,
निसर्गासोबत जगा.
जीवनशाळा 🌿
जीवनशाळा कोर्ससाठी अर्ज करण्यासाठी
https://forms.gle/ULCjAY3LaKmtbCcH7
link open करा आणि form भरा. 🌿

कोकणात आदिम काळापासून झाडं, पशुपक्षी, देवता आणि माणूस एकत्र नांदत आले. निसर्गाने हे सगळं शाश्वत राहावं म्हणून एक राखणदार...
02/01/2026

कोकणात आदिम काळापासून झाडं, पशुपक्षी, देवता आणि माणूस एकत्र नांदत आले. निसर्गाने हे सगळं शाश्वत राहावं म्हणून एक राखणदार ठेवला होता. त्या राखणदारांचीच विविध रूपं आपण या कॅलेंडर मधून साजरी करूया...

ह्या कॅलेंडर मधून आम्ही तुम्हाला एक दृष्टिकोन भेट म्हणून देत आहोत जो निसर्गातला देव शोधायला शिकवेल...

ह्या साठी गावावर मातीवर प्रेम करणाऱ्या अनेकांनी मेहनत घेतली आहे

राखणदार कॅलेंडर साठी संपर्क- 7875875754

ही एक अशी community बनतेय जी कोकणासाठी नेहमी उभी राहील rchistilve ._treescapeartist

Address

Tulas
Savantvadi
416515

Telephone

7038681978

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Konkani Ranmanus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share