04/01/2017
#कृषिमंत्रीबदला
मला नरेंद्र मोदी आवडत्यात. त्येंची पर्राष्ट्र नीतीतली तडफ, देशाच्या सुरक्षेबाबतचा खंबीरपना आनि FDI आकर्षून घेन्याची हातोटी वाखान्न्याजोगी आहे.
पन सत्तेत आल्याच्या पहिल्या दिवसापासून एक बाब मला, आमच्या शेळगावच्या लोकांन्ला आनि खेड्यातल्या जंतेला खटकती आहे
की, तुमचं शेतीचं धोरन नक्की काय हाय ब्वा?
तुमच्या राज्यात डाळीची साठेबाजी व्हती. आन् साठेबाजान्ला तुमी शिक्षा करत न्हाई.
शहरातला मानूस तुमाला इतका जवळचा वाटतो का बाबा जरा कुटं कांदा महागला का तुमचं पानी पानी व्हतं आन् तुमी निर्यातबंदी लावताव.
दोन वर्षाच्या दुष्काळानंतर जरा कुटं बरा पाऊस पल्ला तर लगीच थकीत विजबीलाच्या वसुलीसाठी विज वितरनची गिधाडं पाठिवताव.
आडता शेतकर्याला नाडतो ही खरी गोस्ट हाय. पर त्येचा बंदोबस्त करायला मालावर आडत बंद केलीत. आन् त्यो आडत्या शेतकर्यावर असा उलटला का ब्वा पह्यली कंडिक्सन बरी म्हनायची.
काळा पैका भाईर काढाया तुमी नोटाबंदी केली. लै झ्याक झालं. पर आवं शेहरातल्या येटीयमच्या रांगांचं क्येवढं कवतिक? आमच्या गावामंदी फकस्त येक येटीयम. त्ये बी दोन म्हैन्या पास्नं बंद. कुटल्या बी खेड्यात जावा. हीच बोंब. आडत्ये समदे शेतकर्यान्ला जुन्याच नोटा खपिवत्यात.
सगळ्या ब्यांकांनी गेल्या दोन म्हैन्यात नव्या नोटांचा काळाबाजार क्येला. मंग DCC आन् सहकारी ब्यांकांनी काय घ्वाडं मारलं व्हतं? शेतकर्याचा पैसा सहकारी ब्यांकात हाय म्हनून त्यांच्यावर अन्याय?
मध्यंतरी पीयम सायब तुमी आफरीकेत ग्येल्ता. तितं पिकं घ्यायला तुमी करोडो पैशे वोतले. आन् त्या मालाला आपल्या बाजारातबी आन्नार असाल. आपला शेतकरी सोडून भाईरच्यान्ला का पोस्ताव?
चंद्रावर, मंगळावर यान पाठवाया इतका खर्च करताव. जरा इथल्या शेतीच्या समश्यांवर उत्तरं शोधाया इज्ञानावर खर्च करा की
आता दोन वर्षात निवडनुकाचा टायम यील. पाच वरषं संपत बी आली. पर तुमी बशीवलेला कुर्षिमंत्री राधा का मोहन कोनतरी, त्यो हाय तरी कोन? त्यो नक्की काय काम करत्यो.
सायब आमाला अशी शंका हाय का ब्वा माण्णीय कुर्षिमंत्री राधा का मोहन हेन्ला शेतातलं काय बी कळत न्हाय. कळत आसलं तर समश्या झेपत न्हाय.
सबब तेन्ला तातडीने काढून चांगला तज्ञ अन् तडफदार मानूस बसवा.
जुलैत राष्ट्रपती ची निवडणूक हाय. त्यात राधा का मोहनला उभा करा. आमचं काय बी म्हन्नं न्हाय. पन त्येला कुर्षिमंत्री पद नगं.
_/\_