05/11/2017
पट्टा किल्ल्याचेच दुसरे नाव "विश्रामगड" असे देखील आहे. "विश्रामगड" सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळघाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. अलंग, मदन, कुलंग येथे असणारे घनदाट जंगल, दुर्गमवाटा यामुळे येथील किल्ल्र्यांयची भटकंती फारच अवघड आहे. तर औंढा, पट्टा, या परिसरातील भ्रमंती फारच सोपी आहे. पट्टा किल्ल्याचेच दुसरे नाव "विश्रामगड" असे देखील आहे. इतिहास : पट्टागड शिवाजी महाराजांनी इ. स. १६७१ मध्ये जिकूंन घेतला. पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक मोठे पठारच आहे. येथून अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई, त्रिंबकगड हा सर्व परिसर नजरेत भरतो. या सर्व परिसरावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्र्यांाचा उपयोग होत असे. शिवरार्यांवनी हा किल्ला जिंकला आणि याचे नामकरण 'विश्रामगड' असे केले. जालान्याची लूट केल्यानंतर शिवाजी महाराजांनी काही काळ या किल्ल्यावर घालवला. पुढे इ.स.१६८६ पर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता. १६८२ साली औरंगजेबाने महाराष्ट्रात पदार्पण केले आणि मराठी मुलूख ताब्यात घेण्यास सुरवात केली. १६८८ साली मातबरखानाने बागलाणातील अनेक गड घेण्यास सुरवात केली होती. पट्टागडा संबंधी मातबरखान औरंगजेबाकडे अर्ज पाठवतो त्यात तो म्हणतो सेवकाने काही दिवसांपासून १००० कोळी, भिल्ल, व मावळे र्यां चे पथक सैन्यात घेतले आहे. मराठ्यांच्या ताब्यात असलेले पट्टा व इतर किल्ल्यालगतच्या जमीनदारांना रकमा पुरवण्यात आल्या आहेत. ११ जानेवारी १६८८ ला खानाने काही पथके किल्ला घेण्याच्या मार्गावर धाडली. मध्यरात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या तटाला दोर लावून किल्ला जिंकून घेतला. भगूरचा ठाणेदार गोविंदसिंग याची किल्ल्यावर नेमणूक करण्यात आली. मोगलांनी १६८८ ते ८९ या कालावधीत मराठ्यांचे औंढा, त्रिंबकगड, कवनी, त्रिंगलवाडी, मदनगड, मोरदंत किल्ले फितुरीने घेतले मात्र पट्टागड त्र्यांनना जिंकून घ्यावा लागला. पहाण्याची ठिकाणे : पट्टावाडीतून पायर्यांच्या वाटेने वर आल्यावर दोन गुहा लागतात.यातील एका गुहेमध्ये साधूचे वास्तव्य होते ती गुहा सध्या कुलुप लावून बंद केलेली आहे. दुसर्याध गुहेत राहाता येते. या गुहेच्या पुढेही काही गुहा आहेत, पण वापरात नसल्याने त्र्यांधची अवस्था वाईट आहे. या गुहां जवळून जाणार्याक पायर्यां च्या वाटेने वर चढतांना दोनही बाजूचा कातळ छिन्नी - हातोड्याने तासून गुळगुळीत केलेला दिसतो. मधे तटबंदीचे अवशेष दिसतात. पायर्यां चढून वर गेल्यावर उजवीकडे उत्तरमुखी प्रवेशव्दार दिसते. त्याची कमान आजही शाबूत आहे. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला बुरूज आहे. येथून एक वाट पट्टावाडीत उतरते. प्रवेशव्दार पाहून परत वरच्या दिशेने जातांना कातळात खोदलेल्या पायर्याज लागतात. येथे एक सातवाहन कालीन पाण्याचे टाके आहे. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यापासून वर चढत गेल्यावर अष्टभुजा देवीचे मंदिर लागते या मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्वार केला आहे. मंदिरा समोरून उजव्या बाजूने वर चढत गेल्यावर आपण एका प्रशस्त इमारतीपाशी येतो. या इमारतीला "अंबरखाना" म्हणतात. या इमारतीची बांधणी काळ्या घडीव दगडात केलेली असून आत प्रशस्त दालन आहेत. इमारतीचे छ्त घुमटाकार आहे. येथून वरच्या दिशेने चढत गेल्यावर आपण किल्ल्याच्या माथ्यावर येतो. पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. माथ्यावरून दूरवर औंढा किल्ल्याचा सूळका दिसतो. या पठारावर उजव्या बाजूला ( औंढा किल्ल्याच्या दिशेला) गेल्यावर प्रथम पाण्याची दोन मोठी टाकी लागतात. त्याच्या पुढे काही गुहा लागतात. गुहांच्या पुढे गेल्यावर ओळीत खोदलेली पाण्याची टाकी लागतात, त्र्यांाना "बारा टाकी" म्हणून ओळखतात. येथून सरळ जाणार्याक वाटेने औंढा किल्ल्यावर जाता येते. बारा टाकी पासून परत फिरुन परत येतांना थोडे खालच्या बाजूस उतरून आल्यास अजून काही पाण्याची टाकी पाहायला मिळतात. इतिहास : पट्टागड शिवाजी महाराजांनी इ. स. १६७१ मध्ये जिकूंन घेतला. पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक मोठे पठारच आहे. येथून अलंग, मदन, कुल पुन्हा किल्ल्याच्या माथ्यावर येऊन डावीकडे गेल्यावर काही वास्तूंचे अवशेष दिसतात. गडाच्या डाव्या टोकावर भव्य बुरुज आहे. हा बुरुज आपल्याला किल्ल्याच्या पायर्या. चढतांना डाव्या बाजूस दिसलेला असतो. हा बुरूज पाहून खाली उतरणार्याा वाटेने आपल्याला परत सुरुवातीला पाहिलेल्या गुहेपाशी जाता येते. तेथे आपली गड फेरी पूर्ण होते. संपूर्ण गडमाथा फिरण्यास २ ते ३ तास लागतात.