Raigad

Raigad Raigad

ही माहिती आपल्याला कोणीही सांगणार नाही.
05/12/2024

ही माहिती आपल्याला कोणीही सांगणार नाही.

05/12/2024
आदर्श घ्यायला काही हरकत नाही ?
05/12/2024

आदर्श घ्यायला काही हरकत नाही ?

05/12/2024

नेमकं जगावं कसं ? तर बसच्या एखाद्या कंडक्टर सारखं...!

तासन् तास उभं राहायची लाज नाही आणि बसायला सीट मिळाली तरी माज नाही....!

आख्खी बॅग पैशाने भरलेली असते; परंतु त्यातले चार आणे सुद्धा आपले नाहीत... आपण फक्त बॅग सांभाळणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची...!

चिल्लर साठी एखाद्या वेळी एखाद्याशी वाद होणारच.... परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं समजून दुसऱ्याशी बोलत राहायचं....,!

"पुढे चला... पुढे सरका...." असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस....

खचाखच भरलेल्या बसमधील प्रत्येकाशी यांचं एकदा तरी संभाषण होतंच...
पण कुणावर विशेष लोभ नाही...
कोणावर राग तर मुळीच नाही...
कुणाचा द्वेष नाही...
कुणाचा तिरस्कार नाही...
आपला संबंध फक्त तिकिटापुरता... !

कुणी मध्येच उतरला तर त्याचे दुःख नाही...
कुणी मध्येच बस मध्ये आला तर त्याचं कौतुक नाही...
दोघांसाठी हात पुढे करून दार उघडायचं...
येईल तो येऊ दे.... जाईल तो जाऊ दे...

मूळ ठिकाणी पोचायच्या आधी बस दहा बारा स्टेशनवर थांबते....
प्रत्येक गावात थोडावेळ उतरायचं ....
आळोखे पिळोखे देत, आपलंच गाव आहे असं समजून थोडावेळ रेंगाळायचं....

पण त्या गावात अडकायचं नाही....
आपण इथले नव्हेत हे स्वतःशी बजावत, पुन्हा डबल बेल मारत पुढच्या "ठेसनावर" जायचं....

"शिंगल" बेल मारली की थांबायचं... "डबल" मारली की निघायचं.... बास, इतके साधे नियम पाळायचे....
आयुष्य जास्त किचकट करायचंच नाही...!

हा शेवटचा स्टॉप आहे....समद्यांनी उतरून घ्या... असं सर्वांना बजावत स्वतःची वळकटी उचलायची आणि प्रवास संपला की "आपल्या घरी" निघून जायचं.... !

उद्या कुठे जायचं ? कधी निघायचं ? कुठल्या गाडीतनं जायचं ? ड्रायव्हर कोण असेल.... ? हे ठरवणारा वेगळा असतो...

उद्या गाडी कुठली असेल याची खात्री नाही... ड्रायव्हर कोण असेल याचीही खात्री नाही.... सोबत प्रवासी कोण असतील याची शाश्वती नाही...

शाश्वत एकच आहे... तो म्हणजे प्रवास...!

आपण असू तरी, आणि आपण नसू तरीही... प्रवास कोणाचा ना कोणाचा तरी सुरू राहणारच आहे.... निरंतर आणि निरंतर...!

आपल्या असण्यावाचून आणि नसण्यावाचून कोणालाही काहीही फरक पडणार नाही... प्रवास सुरू राहणारच आहे.... निरंतर आणि निरंतर...!

04/12/2024

मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील डी. के. श्रीवास्तव यांनी लिहिलेल्या या पोस्टमुळे तुमचे ज्ञान वाढेल.

खूप खूप महत्वाचे..
काय भारताची न्यायव्यवस्था?
सामान्य जनतेची फसवणूक करते ?
😔😖😠🥵🥵😡
तुम्हीच बघा....

1 - नेत्याची इच्छा असेल तर तो एकाच वेळी दोन जागांवर निवडणुका लढू शकतो! परंतु...
तुम्ही दोन ठिकाणी मतदान करु शकत नाही.

२ - तुम्ही काही कारणाने तुरुंगात असाल तर तुम्ही मतदान करू शकत नाही.
पण...
नेता तुरुंगात असताना निवडणूक लढवू शकतो.
🤬😠🥵😖😔😔😔

3 - तुम्ही कधी तुरुंगात गेलात तर तुम्हाला आयुष्यभर सरकारी नोकरी मिळणार नाही.

परंतु……
एखाद्या नेत्याला खून किंवा बलात्काराच्या आरोपात कितीही वेळा तुरुंगवास झाला असला तरी तो पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होऊ शकतो, त्याला पाहिजे तोपर्यंत.

4 - बँकेत माफक नोकरी मिळवण्यासाठी
तुम्ही पदवीधर असावे लागते ..

परंतु ...,
नेत्याच्या अंगठ्याचा ठसा असला तरी तो भारताचा अर्थमंत्री होऊ शकतो.
🤬😡😖🥵

5 - तुम्ही सैन्यात अल्पवयीन असणे आवश्यक आहे.
शिपायाची नोकरी मिळवण्यासाठी 10 किलोमीटर धावून पदवी दाखवावी लागते.

परंतु....
नेता अशिक्षित-भ्याड आणि लुळा -पांगळा असला तरीही तो लष्कर, नौदल आणि हवाई दलाला नियंत्रित करणारा संरक्षण मंत्री होऊ शकतो.
🤬😡🥵😠🥵

आणि
ज्याचे संपूर्ण कुटुंब आजपर्यंत एकाही शाळेत गेले नाही.. तो नेता देशाचा शिक्षणमंत्री होऊ शकतो.

आणि
ज्या नेत्यावर हजारो खटले सुरू आहेत.
तो नेता पोलिस खात्याचा प्रमुख, म्हणजेच गृहमंत्री होऊ शकतो.
🥵🥵🥵🤬😖😠

तर
ही व्यवस्था बदलली पाहिजे असे वाटते का?नेता आणि जनता या दोघांसाठी एकच कायदा असावा का?.
तर
कृपया हा मेसेज फॉरवर्ड करून देशात जनजागृती करण्यासाठी तुमचा पाठिंबा द्या.

जर तुम्ही फॉरवर्ड केले नाही तर कोणत्याही नेत्याला दोष देऊ नका.
तसे न केल्यास नुकसानीस तुम्ही जबाबदार असाल.

30 ते 35 वर्षांच्या समाधानकारक सेवेनंतरही सरकारी कर्मचाऱ्याला पेन्शन मिळत नाही? पण आमदार/खासदार यांना फक्त 5 वर्षात पेन्शन मिळते. न्याय कुठे आहे?

श्री. डी. के. श्रीवास्तव
मुख्य सरकारी वकील*
मुंबई उच्च न्यायालय.
मुंबई.....

ही मोहीम पुढे न्या. हटवू नका, आपल्याला ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे.
🚩🍃🌱👏👏
जय हिंद , जय भारत
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👍🏻👍🏻👍🏻

सुरमई साडेसातशेला मिळते. पापलेट  तेराशे रुपयांना. मटण साडेआठशे रुपयांना मिळते. आज काय घ्यावे  याचा विचार करत लिंबाखाली ब...
06/08/2024

सुरमई साडेसातशेला मिळते. पापलेट तेराशे रुपयांना. मटण साडेआठशे रुपयांना मिळते. आज काय घ्यावे याचा विचार करत लिंबाखाली बसलेलो. तोच एका लेबरचा फोन आला. म्हणाला, ‘साहेब जरा पैशांची नड होती.’ मी म्हणलं ‘हा, संध्याकाळी बघू.’ ‘होय साहेब’ म्हणत त्यानं फोन ठेवला. दुपारी अठ्ठावण्ण रुपये लीटरची चितळे दुधाची पिशवी, दीडशे रुपयांचा श्रीखंडाचा डबा आणि पासष्ट रुपयांची लोणच्याची पुडी घेऊन घरी गेलो. घरात गेल्या गेल्या बायकोनं ऑनलाईन मागवलेल्या तीन साड्या दाखवल्या. प्रत्येक साडी साडेसातशे रुपयांची. साड्या बघतानाच पुन्हा त्या लेबरचा फोन आला. म्हणाला, ‘सायेब आत्ता जमलं का भेटायला ?’ वैतागत म्हणालो, ‘अरे बाबा आत्ता लय उन हे. मी येतो की संध्याकाळी. ’केविलवान्या आवाजात तो म्हणाला, ‘साहेब मी आलोय चालत चौकापर्यंत.’

मला धक्काच बसला. म्हणालो, ‘अरे तु एवढ्या उन्हात दोन किलोमीटर चालत आलाय? खुपच गरज आहे का पैशांची?’ हतबल होत म्हणाला, ‘होय साहेब.’ भुवयांचा आकडा करत म्हणालो, ‘किती पैशे पाहिजेत?’ तसा दबक्या आवाजात म्हणाला, ‘शंभर रुपये पायजे होते साहेब.’ ‘थांब थांब आलो मी.’ असं म्हणत गाडी चालू करुन चौकात गेलो. मला पाहताच त्यानं काळपट तोंडावरचा घाम पुसला. आदबीनं हसला. म्हणालो, “काय रे कशाला एवढे अर्जंट पैसे पायजे होते ? सासऱ्याना दारू पाहिजे का मेहुणा हारला जुगारात?
तसा तो उसणं हसू तोंडावर आणत म्हणाला, ‘साहेब तीन दिवस झालं हाजरीच नाय मिळाली. काल दळण टाकलय हितल्या गिरणीत. ते आणाय पैशेच नाय. रात्रीचे पाव खाल्ले पोरींनी. पण आता भुक लागली म्हणून रडाय लागल्यात. म्हणून मग तुम्हाला फोन केला.

याची एक पोरगी दोन वर्षांची, दुसरी तीन महिन्याची.
दीर्घ उसासा घेत मी त्याच्या हातात शंभरच्या दोन नोटा टेकवल्या. तसा हसत म्हणाला, ‘एवढे नको साहेब. शंभर बास होत्यान. पगार झाल्याव तुम्हाला वापस करीन.’ त्याच्या उत्तरांनी तोंडातली थुंकीच सुकली. दोन्ही हात जोडून नमस्कार करत तो गिरणीच्या दिशेनं चालत निघाला.

माझ्या घरातले मासे, श्रीखंड, दुध, लोणचं सगळं बेचव करीत तो बाजरीच पीठ आणायला निघाला होता.माझी बायको दोन अडीच हजारच्या साडया पाहुन जेवढी खुश झाली, त्याहुन जास्त खुश याची बायको होणार होती….

निशब्द…

मित्रांनो, सगळ्या गोष्टींचं सोंग करता येतं, पण पैशाचं व पोटाच सोंग नाही करता येत. आपल्यापैकी बरेच लोकं चांगल्या नोकरीला आहेत. कुटुंबाच्या सर्व गरजा सर्वोपरी पूर्ण जरूर करा. पण काबाड कष्टकऱ्यांना ५०-१०० देताना हात आखडू नका. आज मजुरांचे दिवस वाईट आहेत. बऱ्याच लोकांवर खरोखर कठीण प्रसंग आहे.....🙏
c/p
Laxman Yedage
❤️🎉🙏🏻

Jai Gurudev
04/07/2024

Jai Gurudev

28/05/2024
Raigad
28/05/2024

Raigad

28/05/2024

Address

Tala
402111

Telephone

+918369418932

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raigad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Raigad:

Share

Category