14/06/2026
२६ जुलै २६ म्हणजेच कारगिल विजय दिवस ह्याची २७ वर्ष पूर्ण होत आहेत. दरवर्षी ह्याच दिवशी कारगिल येथे जाऊन भारतीय वीरांना आदरांजली देण्याचा आमचा मानस असतो. २०१६ पासून आम्ही सातत्याने या विशेष सहलीचे आयोजन करत आलो आहोत. ह्या वर्षी देखील आम्ही जात आहोत. त्याच सोबत लेह लडाख भ्रमंती देखील करतो. आमच्या ह्या सहलीची काही ठळक वैशिष्टे म्हणजे अतिशय मर्यादित ग्रुप (८- २० जण एका ग्रुपमध्ये), सर्व सहलीतील प्रवाशांना फिरायला पुरेसा वेळ, आरामदायी वाहनाने प्रवास, उत्तम हॉटेल अथवा रिसॉर्टमध्ये वास्तव्य आणि बरेच काही...!
२५ जुलै ते ०२ ऑगस्ट ह्या दिवसात लडाखच्या सहलीचे नियोजन केलं आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे हे फिरताना धावधाव करत कमी दिवसात फिरण्यापेक्षा, शांत निवांत वेळ घेऊन व्यवस्थित फिरण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत. ह्याचे कारण इतकेच की अशा दूरच्या सहलीला आपण सारखेच भेट देऊ शकत नाही तेव्हा आला आहात तर ते व्यवस्थित फिरायला मिळावे आणि नुसते गेलो आणि भोज्जा करून आलो हे टाळता यावे.
आपण ह्या प्रवासात झोझिला, कारगिल, लेह, नुब्रा, खारदुंगला, तुर्तुक, पॅगाँग-सो बघणार आहोत. आपल्याला आमच्या बरोबर यायचे असल्यास त्वरित आम्हाला संपर्क करा. विशेष म्हणजे विमान प्रवासाची तिकिटे ह्या वर्षी आत्ताही रास्त दरात उपलब्ध आहेत.
अधिक माहितीकरिता त्वरित संपर्क साधा:
कौस्तुभ जोशी: 9820692614/ 9987725131