Andman

Andman शिवसंघ प्रतिष्ठान

राष्ट्रभक्तीचे व्रत घेतलेल्या असंख्य क्रांतिवीरांनी भारतभूमीच्या स्वातंत्र्यसमरात हसत हसत आपल्या प्राणांच्या आहूती दिल्या. कठोर परिश्रम करत फासाचे दोर आनंदाने गळ्यात अडकवून घेतले. कित्येक जण परागंदा झाले , कित्येकांचे संसार , घरदार उध्वस्त झाले. १०० ते १५० वर्षापूर्वी अंदमानसारख्या निर्जल बेटावर क्रांतीकारकांकरिता छळ छवणी उघडण्यात आली होती.जेथे असंख्य क्रांतिवीर यमयातना भोगत स्वातंत्र्याचे स्तोत्

र गात होते. या क्रांतिवीरांचे महामेरू, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही याच सेल्युलर जेलमध्ये आपल्या आयुष्याची ११ वर्षे व्यतीत केली. सावरकर आणि इतर अनेक क्रांतिवीर यांच्या धाडसाच्या गगनभरारीला खरोखरच सीमा नव्हती.
आपण आज जे स्वातंत्र्य उपभोगतोय ते केवळ आणि केवळ या राष्ट्रभक्तांच्या प्राणाहूतीमुळे. या देशभक्तांच्या देशसेवेची, त्यांनी भोगलेल्या यातनांची आजच्या पिढीला जाणीव व्हावी ह्या उद्देश्याने काही वर्षापूर्वी आम्ही १ लाख लोकांना अंदमान येथे अभिवादन यात्रेस नेऊ असा संकल्प केला. या आमच्या संकल्पाला अनेकांनी या यात्रेत सहभागी होऊन उत्तम प्रतिसाद दिला. या पुढेही आपण आम्हाला अशाच प्रकारचा प्रतिसाद द्याल असा आम्हाला विश्वास आहे. तरीही, मी आपणास जाहीर आवाहन करतो की मोठ्यात मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होऊन आमच्या या संकल्पास पाठबळ द्या .

आपला नम्र

निलेश गायकवाड.

Address

Shree Anand Society, Bhandar Ali, Thane (W)
Thane
400602

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 5pm

Telephone

9969739479

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Andman posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Andman:

Share

Category