27/11/2018
नुकतच हरिच्छंद्र गडाच्या कोकणकडा परिसरात वेळेचं नियोजन चुकल्यामुळे काही डोंगरप्रेमीना अंधारात रात्र काढावी लागली.
अशी वेळ येऊ नये व आलीच तर काय करावे या साठी #माहिती, नवागतांसाठी आहे, अनुभवी भटक्यांनी त्यात अधिक भर घालून अननुभवी निसर्गप्रेमींपर्यंत पोहचवावी...
१, कितीही लहान व सोपा ट्रेक असला तरी आपल्या सॅक मध्ये टॉर्च, एक कपड्यांचा जोड, थोडं खाणं व पाण्याच्या २ बाटल्या सोबत ठेवाव्यातच.
२, भटकंतीच्या काळात घरी पोहचेपर्यंत मोबाईलचा वापर जपून वापरावा, त्याची बॅटरी डिस्चार्ज होणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असेल तर चांगली powerbank सोबत ठेवावी.
३, चालताना आसपास पाण्याच्या जागा असतील तर त्या पाहून ठेवाव्यात. पाणी संपून घसा कोरडा पडला तर मिळेल ते पाणी पिण्यास कचरू नये. **पाण्याने infection झालं तर ते Cure करता येते, पण dehydration चे परिणाम त्यापेक्षा वाईट असतात.**
४, रात्री उघड्यावर राहायची वेळ आली तर सोबत आणलेला जादा कपड्याचा जोड घालून झोपावे, थंडी कमी लागेल. कपड्याचा जोड नसल्यास सॅक मध्ये पाय घालून झोपावे.
झोपताना रात्री पायातील बूट न काढता झोपल्यास उत्तम.
५, उघड्यावर रात्र काढायची वेळ आलीच तर थोडा आडोसा पाहून झोपावे, त्यामुळे गार वारा लागणार नाही.
६, अशी अपरात्र टाळता येणे शक्य नसल्यास काळोख पडायच्या आधीच थांबून सुरक्षित जागा पाहून मुक्काम करावा. कड्याच्या धारेवर, तीव्र उतारावर, गर्द रानातला मुक्काम टाळण्याचा प्रयत्न करावा. जरा उघडी जागा पाहावी व रात्र काढावी.
७, आपल्याकडे, सह्याद्रीत रात्र काढावी लागली व खूप थंडी वाजली तरी बिथरून जाऊ नये, *इथली थंडी हिमालयातील थंडी सारखी जीवघेणी नाही हे मनात पक्क लक्षात ठेवावं. त्यामुळे रात्री त्रास होईल पण जीव जाण्याची भीती नाही. त्यामुळे panic होऊ नये.*
८, बऱ्याच वेळा नवागतांच्या पायातील चप्पल वा shoes दगा देतात व त्यांचा चालण्याचा वेग कासावा सारखा होऊन वेळेचे अंदाज चुकतात. म्हणून सोबत असलेल्या जाणत्या व्यक्तीने जादा चप्पल वा shoes चा एक तरी जोड सोबत ठेवावा.
९, वाट चुकल्यामुळे अवघड जागेवरून चालताना, स्क्री वरून उतरताना नवीन लोकांचा खूप वेळ जातो, अशावेळी त्यांना हात देऊन - मदत करून वेळ वाचववा, दिवसाच्या उजेडाचा चांगला वापर करावा.
१०, डोंगरातील दिवसाचा-प्रकाशाचा वेळ अमूल्य असतो तो जास्तीत जास्त वापरायल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात.
११, बाहेर, उघड्यावर, अपरिचित जागेत रात्र काढायची वेळ आलीच तर सोबत असलेल्या लहान मुलांची व नाजूक व्यक्तींची प्रथम काळजी घ्यावी. खाणं व पाणी असल्यास प्रथम त्यांना द्यावे.
१२, अनोळखी डोंगर दऱ्यातुन रात्री वाट काढण्याचा अननुभवी व्यक्तीने प्रयत्न करू नये. काळोख पडण्यापूर्वीच सुरक्षित जागा पाहून थांबावे.
१३, आपण चुकून, वाटा हरवून खूपच वेळ झाला असेल तर गोंगाट टाळून माणसांच्या,कुत्र्याच्या आवाजाचा कानोसा घ्यावा.
जवळ गाव -वस्ती असेल तर कुत्र्यांच्या भूकंण्याचा आवाज कानावर येतो त्यामुळे वस्तीची दिशा व अंतर कळू शकते. आपल्याला कोणी शोधत आले असेल तर त्यांच्या हाका सुद्धा ऐकू येऊ शकतात
१४, रात्री कोणी शोधायला आलेच तर आपल्याजवळील टॉर्चच्या झोताने आपले अस्तित्व दाखवून ठेवावं.
१५, मोबाइल चालू असेल व शक्य असेल तर स्वतःचे लोकेशन पाठवावे.
१६, शक्य असेल तर, आणि खालचे गाव-वस्ती दिसत असेल तर त्याचा फोटो काढून पाठवावा. या फोटोवरूनही जाणकार भटके तुमचे लोकेशन समजू शकतात...
१७, वाहते ओढे, खोल डबकी, धबधब्यांचे प्रवाह आणि बेलाग कडे यापासून दूर राहावे. एवढी काळजी घेतली तर सह्याद्री मुळीच जीवघेणा नाही.
धीर ठेवा तुमच्यापर्यंय नक्कीच मदत पोहचेल.
#भटकंतीनुकतच हरिच्छंद्र गडाच्या कोकणकडा परिसरात वेळेचं नियोजन चुकल्यामुळे काही डोंगरप्रेमीना अंधारात रात्र काढावी लागली.

साभार : धनंजय मदन