Konkani Ranmanus

Konkani Ranmanus Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Konkani Ranmanus, Tulas, Savantvadi.

17/08/2026

जल, जंगल, जमीन…
आता त्यांच्या वारशाचे राखणदार होण्याची वेळ आपली. .

16/08/2026

स्वातंत्र दिन चिरायू होवो 🇮🇳

10/08/2026

स्वातंत्र्य साजरं करूया… आणि जल , जंगल, जमीन जपण्याची शपथ घेऊया..

23/07/2026

छत्रपती शिवाजी महाराजांचा आज्ञापत्र 🙏

आज जीवनशाळेत, जमिनी न विकण्याबाबतचा ऐतिहासिक आणि प्रभावी निर्णय घेणाऱ्या पाल या गावातील माऊलींसोबत आणी जानकारांन सोबत, क...
22/07/2026

आज जीवनशाळेत, जमिनी न विकण्याबाबतचा ऐतिहासिक आणि प्रभावी निर्णय घेणाऱ्या पाल या गावातील माऊलींसोबत आणी जानकारांन सोबत, कोकणातील तरुण, महिला वर्ग, शेतकरी याचे प्रश्न, रोजगार, कृतिशील कार्यक्रम घेण्याबाबत संवाद झाला. येणाऱ्या काळात आम्ही जीवनाशाळेच्या माध्यमातून यात त्यांना पूर्णपणे सहकार्य करू आणि एक कोकणात सक्षम रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करू.

आज शहरात कार्यक्रमासाठी फिरत असताना, या चिमुकलीशी माझी भेट झाली आणि तिने ही भेट दिली. नक्कीच तिच्या सर्जनशील कलेतून हे स...
09/07/2026

आज शहरात कार्यक्रमासाठी फिरत असताना, या चिमुकलीशी माझी भेट झाली आणि तिने ही भेट दिली. नक्कीच तिच्या सर्जनशील कलेतून हे स्पष्ट होते की हिरवा रंग म्हणजे निसर्ग आणि ते जपण्यासाठी लढणारा, संघर्ष करणार तो "रानमाणूस" खरा राखणदार...

06/07/2026

राखणदार यात्रा | दुसरा टप्पा
रेडी ते तळाशील 🌿

रान, नदी, समुद्र, देवराई आणि गाव यांच्याशी पुन्हा नातं जोडण्याचा प्रवास…

गावागावात संवाद, स्थानिक प्रश्नांची जाण आणि प्रत्येक गावात एक राखणदार उभा करण्याचा संकल्प.

कारण पृथ्वी वाचवण्याची लढाई आपल्या गावापासूनच सुरू होते.

गाव छोडब नही.
जंगल छोडब नही.
माय माटी छोडब नही.
लडाय छोडब नही.

कोकण हा केवळ भूभाग नाही, तर आपली संस्कृती, शेती, जैवविविधता आणि पुढील पिढ्यांसाठीचा अमूल्य वारसा आहे. विकास हवा, पण तो स...
04/07/2026

कोकण हा केवळ भूभाग नाही, तर आपली संस्कृती, शेती, जैवविविधता आणि पुढील पिढ्यांसाठीचा अमूल्य वारसा आहे. विकास हवा, पण तो स्थानिकांच्या संमतीने, पर्यावरणाचा समतोल राखणारा आणि शाश्वत असलाच पाहिजे.

आज राजापूर येथे विविध गावांतील नागरिक, अभ्यासक, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमी एकत्र आले आणि 'कोकण अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघ' स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. ही केवळ एका संघटनेची स्थापना नाही, तर कोकणच्या अस्तित्वासाठी उभी राहणाऱ्या लोकशक्तीची सुरुवात आहे.

मतभेद असू शकतात, विविध मते असू शकतात; पण कोकणच्या भवितव्याचा निर्णय घेताना कोकणातील लोकांचा आवाज केंद्रस्थानी असलाच पाहिजे. विकासाचा मार्ग लोकशाही, पर्यावरण आणि स्थानिकांच्या हिताचा असणे हीच खरी प्रगती आहे.

या शाश्वत कोकण परिषदेत सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले, याचा मनापासून आनंद आहे. माझ्यासोबत आमच्या राखणदार संघातील अनेक सहकारीदेखील या परिषदेत सहभागी झाले. त्यांनी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली, उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला आणि शाश्वत, स्वावलंबी व पर्यावरणपूरक कोकणाच्या संकल्पनेला अधिक बळ दिले.

हा प्रवास केवळ विरोधाचा नाही, तर आपल्या मातीचा, निसर्गाचा, शेतीचा आणि पुढील पिढ्यांच्या भविष्याचा सन्मान राखणाऱ्या शाश्वत विकासासाठीचा सामूहिक निर्धार आहे.

Address

Tulas
Savantvadi
416515

Telephone

7038681978

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Konkani Ranmanus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share