18/10/2016
आपण हॉलिडे साठी का जातो... ? रिलॅक्स होण्यासाठी, मौज-मस्ती करण्यासाठी, की टूर ला जाऊन थकून आल्यानंतर घरी दोन-तीन दिवस आराम करण्यासाठी.. ?
बहुतांशी लोकांच्या तोंडून आपण ऐकतो कि अमुक एका कंपनीच्या ग्रुप टूर ला जाऊन आलो, खूप थकायला झालय, दोन-तीन दिवस आराम करणार आणि मगच कामावर रुजू होणार. मग येथे साहजिकच वरील प्रश्न उद् भवतो कि आपण हॉलिडे साठी का जातो... ? रिलॅक्स होण्यासाठी, मौज-मस्ती करण्यासाठी, की टूर ला जाऊन थकून आल्यानंतर घरी दोन-तीन दिवस आराम करण्यासाठी.. ?
जेव्हा आपण एखाद्या कंपनीच्या पॅकेज टूर मधून हॉलिडेसाठी जातो तेव्हा आपल्याला त्या कंपनीच्या नियमावलीनुसार प्रवास करावा लागतो. जसे कि सकाळी ६ वाजता वेकअप कॉल, ७ वाजता ब्रेकफास्ट, ८ वाजता बस निघणार इ. तसेच आपल्याला एखादे ठिकाण आवडले व तिथे जास्त वेळ घालवावा वाटला तर तसे करता येत नाही, कारण तेथे आपल्या सोबत ग्रुप टूर ला आलेले इतर प्रवासीही असतात. परिणामी आपल्याला आपल्या मनाजोगा हॉलिडे एन्जॉय करता येत नाही, आणि रिलॅक्स होणे तर दूरच. परंतु हेच आपण जेव्हा वैयक्तिकरित्या म्हणजेच कस्टमाईझ्ड हॉलीडेसाठी जातो तेव्हा आपल्याला आपल्या वेळेनुसार, आवडी-निवडी नुसार हॉलिडे एन्जॉय करता येतो व रिलॅक्सही होता येते. आणि खरे पाहता यालाच योग्य हॉलिडे म्हणता येईल. व हेच आपल्याला "केएमसी हॉलीडेज" सोबत अनुभवता येते आणि ते सुद्धा ग्रुप टूर पेक्षा कमी किंमतीत ..
KMC Holidays & Offshore Pvt. Ltd.
KMCHOLIDAYS.COM