वाई

वाई Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from वाई, Tourist Information Center, Wai.

08/02/2025
कितीही जग फिरा.. मन इथच रमतं
18/08/2023

कितीही जग फिरा.. मन इथच रमतं

21/12/2022
21/12/2022

निसर्गरम्य कोकणातील एक सुंदर कौलारू घर

छायाचित्र : संकेत तवटे

वाईचा महागणपती...पेशवाईच्या काळातील कलेचा अविष्कार म्हणजे वाईचा महागणपती. ज्याला लाडाने ढोल्या गणपती म्हणूनही ओळखलं जातं...
31/08/2022

वाईचा महागणपती...

पेशवाईच्या काळातील कलेचा अविष्कार म्हणजे वाईचा महागणपती. ज्याला लाडाने ढोल्या गणपती म्हणूनही ओळखलं जातं.
नाना फडणवीस आणि सरदार रास्ते यांनी अनेक सुबक अशा मंदिरांच बांधकाम केलं श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे चिरंजीव श्रीमंत बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवे हे वाईचे जावई. सरदार भिकाजी रास्त्यांची कन्या गोपिकाबाई आणि नानासाहेब पेशवे यांचा विवाहसोहळा वाई येथे पार पडला. भिकाजीपंतांना एकुण सात पुत्र, हे सातही पुत्र अत्यंत कर्तबगार आणि मराठा साम्राज्याशी सदैव एकनिष्ठ राहीले. भिकाजीपंतांचे पुत्र मल्हारपंत यांच्या मृत्यूनंतर त्यांचे धाकटे बंधू आनंदराव यांना सरदारकी मिळाली. आनंदराव रास्त्यांनी वाईतील धर्मपुरी पेठ वसवली.

वाई गावाभोवती कुसू म्हणजेच तटबंदी बांधली. आनंदरावांचे बंधू गणपतराव रास्ते हे आपल्या वडील आणि भावाप्रमाणेच कर्तबगार होते. इ.स. १७६२ मध्ये त्यांनी महागणपतीचे मंदिर बांधले. महागणपतीची स्थापना वैशाख शुध्द १३ शके १६९१ मध्ये करण्यात आली. या मंदिराच्या बांधणीसाठी सुमारे दिड लाख रूपये खर्च आला असावा असा अंदाज आहे. श्रीमंत माधवराव पेशव्यांनी कर्नाटकवर स्वारी केली. सरदार रास्ते, सांगलीचे सरदार पटवर्धन हे या स्वारीमध्ये पेशव्यांच्या खांद्याला खांदा लावून लढले. कर्नाटकातील मंदिरे तेथील शिल्पकला यांचा सरदार रास्त्यांनी खुप जवळून अभ्यास केला. तेंव्हाचे बंगळूरू म्हणजेच आताचे बेंगलुरू येथील दोड्डा गणपतीच्या मंदिरातील मुर्ती आणि वाईतील ढोल्या गणपतीमध्ये खुप साम्य आहे. काही अभ्यासकांच्या मते कदाचित कर्नाटकातील मंदिरकलेची प्रेरणा घेऊन या मुर्तीची निर्मिती झाली असावी. मंदिराच्या मंडपास पुर्वेस तीन आणि दक्षिण आणि ऊत्तरेस प्रत्येकी पाच अशा तेरा कमानी आहेत. वास्तविक महागणपतीची मुर्ती ही बैठ्या स्वरूपाची आहे. तरीही तिची उंची सहा फूट आणि रूंदी सात फूट अशी आहे. मुर्तीच्या गळ्यात हार, बाजूबंद आणि पायातील तोडे स्पष्ट दिसतात. मंदिराच्या गाभार्‍यावर असलेलं शिखर नलिकास्वरूपाचं आहे. वाईतील इतर मंदिरांच्या शिखरापेक्षा महागणपती मंदिराचे शिखर उंच आहे. कृष्णा नदीपात्रालगत असल्यामुळे मंदिराचं बांधकाम करताना संभाव्य पुरपरिस्थितीचा पुरेपुर विचार केलेला दिसतो. मंदिराची पश्चिम भिंत बाहेरून कोनाकृती आहे. त्यामुळे कितीही मोठा पुर आला तरी पाणी या भिंतीपाशी दुभंगले जाते आणि मंदिराला कोणताही धोका पोहचत नाही. सरदार रास्त्यांनी वाईला नखशिखांत नटवलं. जिथे महागणपती मंदिर बांधल तिथेच एक पेठ वसवली. या पेठेला गणपती आळी अस नाव दिल. याच आसपासच्या काळात अजुन एका पेठेची निर्मिती झाली. एका बाजुशा गंगापुरी आणि एका बाजुला गणपती आळी या दोन्ही मध्ये वसवलेली पेठ म्हणून या पेठेचं मधली आळी अस नामकरण झालं.

या आणि अशा अनेक ऐतिहासिक वास्तु वाई शहर आजही आपल्या अंगाखांद्यावर खेळवुन आहे. काहींची माहीती सापडते तर काहींच अस्तित्व अजुनही इतिहासाच्या पानांमध्ये दडून बसलय. कुण्या अभ्यासकाने किंवा संशोधकाने या अज्ञात ठिकाणांना उजेडात आणलं असेलही. अशा या वाईमधील गणेशाची परंपरा आजही वाईकरांच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि ही परंपरा आजही जपलेली आहे.

सदर लिखाणाचे काॅपीराईट्स आहेत.
लेखक : © आदित्य चौंडे
छायाचित्रे : © वैभव जाधव.

YouTube : https://youtube.com/channel/UCCNAFu-v4hNYQpPWObvRU6Q

वाई पर्यटनचे अधिकृत इन्स्टाग्राम पेज फाॅलो करा
https://www.instagram.com/waitourismofficial/

29/08/2022

तुमचा विश्वास बसणार नाही ही वाई आहे.

तुम्ही यासाठी हिमाचल प्रदेश, नाॅर्थ इस्ट, काश्मिर, बाली, स्वित्झर्लंडला जाता. एकदा ही रिल नक्की पहा.

नेहमीप्रमाणे मी केलेल्या माझ्या सोलो ट्रिपच्या फोटोंचा विलक्षण सुंदर असा संग्रह तुमच्यासाठी लवकरच घेऊन येतोय.

वाई तालुक्यातल्या कोणत्याही पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी कसलीही मदत हवी असेल किंवा सहली आणि ट्रेक करायच्या असतील तर निश्चित मला काॅल करा.

- Vaibhav Jadhav. Maharashtra Tourism Certified Tourist Guide.
Phone - 9373368680 https://www.instagram.com/reel/ChxNMPiBML1/?igshid=YmMyMTA2M2Y=

जागतिक वडापाव दिनाच्या निमित्ताने...
23/08/2022

जागतिक वडापाव दिनाच्या निमित्ताने...

श्रावणातला वैराटगड, वाई. छायाचित्रे : वैभव जाधव. वाई पर्यटनचे अधिकृत इन्स्टाग्राम पेज : https://www.instagram.com/wai_to...
19/08/2022

श्रावणातला वैराटगड, वाई.
छायाचित्रे : वैभव जाधव.

वाई पर्यटनचे अधिकृत इन्स्टाग्राम पेज : https://www.instagram.com/wai_tourism_official/

कमळगड, वाई. छायाचित्रे : वैभव जाधव. वाई मधील अशाच सुंदर पर्यटनस्थळांची माहीती मिळवण्यासाठी वाई पर्यटनचे अधिकृत इन्स्टाग्...
18/08/2022

कमळगड, वाई.
छायाचित्रे : वैभव जाधव.

वाई मधील अशाच सुंदर पर्यटनस्थळांची माहीती मिळवण्यासाठी वाई पर्यटनचे अधिकृत इन्स्टाग्राम पेज फाॅलो करा : https://www.instagram.com/wai_tourism_official/

Address

Wai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वाई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share